Home / महाराष्ट्र / Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीच्या शासकीयमहापूजेचा मान एकनाथ शिंदेंना

Kartiki Ekadashi: कार्तिकी एकादशीच्या शासकीयमहापूजेचा मान एकनाथ शिंदेंना

Kartiki Ekadashi: यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्यात आला आहे. त्यांच्या...

By: Team Navakal
Kartiki Ekadash

Kartiki Ekadashi: यंदाच्या कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi) शासकीय महापूजेचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्यात आला आहे. त्यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात २ नोव्हेंबर रोजी शासकीय महापूजा पार पडणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.

आषाढी एकादशीची महापूजा ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची परंपरा आहे. मात्र, राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे असल्याने कोणाच्या हस्ते पूजा व्हावी, या संदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. यावर तोडगा म्हणून मंदिर समितीने विधी व न्याय विभागाकडे मत विचारले होते. विभागाने एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ते सपत्नीक महापूजा करणार आहेत.

दरम्यान, यंदा २६ ऑक्टोबरपासून भाविकांसाठी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कार्तिकी सोहळा अधिक भव्य आणि सुव्यवस्थित पार पडणार असल्याचे मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


हे देखील वाचा –

पुणे पोलिसांकडून खडसेंची खेवलकर प्रकरणात चौकशी

इंदू मिल स्मारक पुतळा प्रतिकृतीत दोष?डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसतच नाही!

Web Title:
संबंधित बातम्या