Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षांमध्ये आपापसातच एकमेकांवर कुरघोडी होताना दिसत आहे. एकमेकांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश करुन घेण्याच्या घटनाना वेग आला आहे. या सततच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेचे मंत्री व्यथित झाले आहेत. त्यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार देखील टाकला. केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॅबिनेट बैठकीत उपस्थित होते.तर इतर मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जावून पक्षप्रवेशाच्या घटनांवर मोठी नाराजी व्यक्त केली आहे. कल्याणमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश दिल्याचं सांगत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. पण या फोडाफोडीच्या राजकारणाला तुम्हीच सुरुवात केली असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुनावलं.
“महायुतीमधील या फोडाफोडीला तुम्ही उल्हासनगरमधून सुरुवात केली. तुम्ही करणार तर ते चालेले आणि भाजपने केलं तर चालणार नाही, असं होणार नाही”, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री दादा भुसे, मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री प्रताप सरनाईक यांचा समावेश असल्याची माहिती आहे. या घडामोडींनंतर आता विरोधकांकडून मोठे दावे केले जात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रकांत खैरे यांनी यासगळ्यासंदर्भात खळबळजनक दावे केले आहेत.
“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार भाजपात जातील, या बातम्यांमुळे एकनाथ शिंदे सध्या नाराज आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे २० आमदार सोडून जातील”, असं धक्कादायक विधान चंद्रकांत खैरे यांनी केलं. चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना या संबंधित खळबळजनक दावा केला आहे. ते म्हणतात शिंदे नाराज जरी असले तरी नियतीचा खेळ कसा असतो बघा, तुम्ही उद्धव ठाकरे यांना सोडून गेलात. ४० लोकं सोबत घेऊन गेलात. आता नियतीचा खेळ असा आहे, तुम्ही त्यांना सोडलं, आता हे तुम्हाला सोडतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते चांगलं करत आहेत. त्यांना देखील समजू दे की त्यांची नेमकी काय चूक होती”, असा टोला देखील खैरैंनी लगावला.
हे देखील वाचा –
Shiv Thakare : बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग; आगीचा व्हिडिओ होतोय वायरल









