बुलडाणा- वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे बुलडाण्याचे शिंदे गटाचे (Shivsena Shinde faction) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची नुकतीच पक्षाच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर चिखली(Chikhali) शहरात त्यांनी शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पहिली संवाद बैठक घेतली. मात्र या बैठकीत लावलेल्या स्टेजवरील बॅनर(Banner)वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांचे छायाचित्र नसल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या बॅनरवर फक्त आमदार संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड (Mrityunjay Gaikwad) यांचीच छायाचित्रे (Photo) होती. विशेष म्हणजे, बॅनरवर पक्षाचे नाव, पक्षाचे चिन्ह किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांचेही छायाचित्र नव्हते. शिवसेनेत वरिष्ठ नेत्यांचे फोटो, पक्षाचे नाव (Party name) व चिन्ह (Party symbol) बॅनरवर असणे हा अलिखित नियम मानला जातो. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गायकवाड यांच्या नाराजीच्या चर्चांना खतपाणी मिळाले आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. यामुळे ते नाराज असलेल्या चर्चेला आणखी बळ मिळाले.