Elections postponed- राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये उमेदवारांचे निधन झाल्यामुळे तेथील नगर परिषदेच्या तीन प्रभागांमधील निवडणूक कार्यक्रम ( Elections postponed) स्थगित करण्यात आला आहे. यामध्ये बीड, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील २८८ नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला असतानाच काही ठिकाणी उमेदवारांचेच अकाली निधन झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने नियमानुसार या प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषदेच्या प्रभाग ११ मधील उमेदवार दुरदाना बेगम फारुकी यांचे निधन झाले. तसेच धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर पंचायतीच्या प्रभाग २ मधील उमेदवार कुसुमबाई पाथरे आणि नाशिकच्या मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग १० मधील उमेदवार नितीन वाघमारे यांचेही निधन झाले. या तिन्ही उमेदवारांच्या निधनामुळे या प्रभागांमधील निवडणुका आयोगाने पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी आता नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. पण या दोन्ही प्रभागात नगराध्यक्ष पदाची निवडणूक मात्र ठरल्याप्रमाणेच होईल.
—————————————————————————————————————————————————–
हे देखील वाचा-
:फुगा फुटतोच ! अजित पवारांचा राजन पाटलांवर हल्लाबोल
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण ! मुंबई-आग्रा महामार्गवर आंदोलन









