Home / महाराष्ट्र / काँग्रेसने भगव्या आतंकवादाचे नरेटिव्ह आणले; फडणवीसांची टीका

काँग्रेसने भगव्या आतंकवादाचे नरेटिव्ह आणले; फडणवीसांची टीका

मुंबई – माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Former PM Manmohan Singh) यांच्या सरकारने भगवा आतंकवादाचे नरेटिव्ह तयार केले आणि हिंदू(Hindu) समाजाला दहशतवादी...

By: Team Navakal
Fadnavis criticizes Congress

मुंबई – माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Former PM Manmohan Singh) यांच्या सरकारने भगवा आतंकवादाचे नरेटिव्ह तयार केले आणि हिंदू(Hindu) समाजाला दहशतवादी ठरवले त्याच वेळी हा छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा भगवा असल्याची आठवण आली नव्हती का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला.

फडणवीस पुढे म्हणाले की, मालेगाव (Malegaon bomb blast) प्रकरणाच्या निकालानंतर सर्वांच्या लक्षात आले असेल की, काँग्रेसने (Congress) हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद असे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार केला होता, तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि २००० च्या सुरुवातीच्या काळात संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर आतंकवादी हल्ले झाले. अमेरिका, युरोप आणि भारतामध्येही काही हल्ले घडले. या हल्ल्यांचे धागेदोरे थेट पाकिस्तानपर्यंत जात होते. यातूनच एक इस्लामिक टेररिझम अशा पद्धतीची भावना निर्माण झाली. ही भावना भारताने तयार केलेली नव्हती. मात्र, जगभरात या संकल्पनेचा स्वीकार होत असताना, काँग्रेसला आपल्या व्होट बँकवर याचा विपरीत परिणाम होतो आहे, असे जाणवले. म्हणूनच त्यांनी एक वेगळा नरेटिव्ह तयार केला. सर्व मुसलमान दहशतवादी आहेत, असे कोणीही म्हणत नव्हते. पण काँग्रेसने मात्र सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी एक षडयंत्र रचले. हिंदू आतंकवाद, भगवा आतंकवाद असे शब्द प्रचारात आणून, अनेक निष्पाप लोकांना अटक करण्यात आली

Web Title:
संबंधित बातम्या