‘तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे’, फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर; ठाकरे म्हणाले…

Devendra Fadnavis to Uddhav Thackeray

Devendra Fadnavis to Uddhav Thackeray | महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन जोरात सुरू असताना आज एका मोठ्या राजकीय घटनेनं सर्वांचं लक्ष वेधलं. विधान परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिलेल्या ऑफरची राजकीय (Maharashtra Politics) वर्तुळात चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्ताधाऱ्याकडे येण्याचा स्कोप असल्याचे म्हणत थेट ऑफर दिली. तर यावर आता उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांचा आज सभागृहात भावनिक निरोप झाला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवारांसह अनेक नेत्यांनी त्यांचं कौतुक केलं. यावेळी बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली

फडणवीसांची ठाकरेंना थेट ऑफर

दानवे यांच्या कामाचं कौतुक करताना फडणवीस म्हणाले, “दानवेंनी विरोधी पक्षनेते म्हणून खूप चांगलं काम केलं. मी स्वतःही काही काळ हे पद भूषवलंय आणि विरोधात लढण्याचा मला मोठा अनुभव आहे. शासनात 10 वर्षं काम केल्यानंतर आता त्याची गुणवत्ता समजते. दानवेंनीही या भूमिकेला साजेशी कामगिरी केली, त्यांचा निरोप असला तरी पुन्हा सभागृहात येण्याची आमची इच्छा आहे.”

पण याचवेळी त्यांनी ठाकरेंकडे वळून हसत सांगितलं, “दानवे पुन्हा येऊ शकतात, पण तेच पद नाही. उद्धवजी, तुम्ही म्हणाल ‘आम्ही पळवापळवी करतो,’ पण 2029 पर्यंत तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज नाही. तरी सत्तेत येण्याचा पर्याय तुमच्यासाठी खुला आहे, यावर विचार करता येईल!”

फडणवीसांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील भाषण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “दानवे, जोरात ‘पुन्हा येईन’ म्हणा, पण त्या पक्षातूनच!” नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांना फडणवीसांच्या ऑफरवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,, “हा प्रश्न नुसता बाकाचा नाही तर प्रसंग बडा बाका आहे. सभागृहात काही गोष्टी खेळीमेळीने होत असतात. त्या खेळीमेळीने घ्यायला हव्यात.” यातून त्यांनी ही ऑफर नाकारल्याचं स्पष्ट झाले.

हे देखील वाचा –

Israel attacks Syria: इस्त्रायलने सीरियावर हल्ला का केला? थेट लष्कराला लक्ष्य करण्याचे कारण काय? जाणून घ्या

Maharashtra Code Pink: महाराष्ट्रातील रुग्णालयात लागू करण्यात आलेला ‘कोड पिंक’ काय आहे? जाणून घ्या

अंतराळवीर शुभांशू शुक्ला सुखरूप परतले! भारताने इतिहास रचला! अभिमानाचा क्षण