Home / महाराष्ट्र / Bengali Baba Arrested: मुंबई लोकलमध्ये पोस्टर्स लावून प्रवाशांना ठगणाऱ्या ‘बंगाली बाबा’वर मोठी कारवाई; पोलिसांकडून अटक

Bengali Baba Arrested: मुंबई लोकलमध्ये पोस्टर्स लावून प्रवाशांना ठगणाऱ्या ‘बंगाली बाबा’वर मोठी कारवाई; पोलिसांकडून अटक

Bengali Baba Arrested: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘बंगाली बाबा’चे पोस्टर्स नेहमीच पाहायला मिळतात. या भोंदू बाबांच्या जाळ्यात...

By: Team Navakal
Bengali Baba Arrested
Social + WhatsApp CTA

Bengali Baba Arrested: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या डब्यांमध्ये ‘बंगाली बाबा’चे पोस्टर्स नेहमीच पाहायला मिळतात. या भोंदू बाबांच्या जाळ्यात अनेक निष्पाप प्रवासी अडकतात. या प्रकाराची गंभीर दखल घेत मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या संयुक्त पथकाने दक्षिण मुंबईतील रे रोड परिसरात मोठी छापेमारी केली. या कारवाईत रेल्वे पोलिसांनी स्वतःला ‘बंगाली बाबा’ म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

गुप्त माहितीच्या आधारे कारवाई

वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांकडून मिळालेली माहिती आणि गुप्तचरांच्या हवाल्याने रेल्वेच्या विशेष पथकाने दारुखाना, रे रोड येथील मीरा अली दर्गा परिसरात सापळा रचला होता. या कारवाईत मध्य रेल्वेचे एएसआय पी.के. मिश्रा आणि पश्चिम रेल्वेच्या आयटी सेलचे अधिकारी सामील होते.

पोलिसांनी मोहम्मद नझीर अंदारी याला अटक केली असून, त्याच्याकडे रेल्वेच्या मालमत्तेवर लावण्यासाठी तयार ठेवलेले तब्बल 15,000 छापील पोस्टर्स सापडले आहेत.

रेल्वे मालमत्तेचा अवैध वापर

अटक करण्यात आलेल्या आरोपीने कबुली दिली आहे की, तो ‘बंगाली बाबा’च्या नावाखाली ही जाहिरातबाजी करत होता. रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता रेल्वेच्या डब्यांमध्ये आणि स्थानक परिसरात हे पोस्टर्स लावले जात होते. यामुळे केवळ रेल्वेचे विद्रुपीकरण होत नव्हते, तर लोकांची फसवणूकही केली जात होती. वडाळा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी कलम 144, 145(ब), 147 आणि 166 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, अशा भोंदू बाबांच्या जाहिरातींना बळी पडू नका आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या