Famous Actor Director Death : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील याचे दुःखद निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी त्याने मुंबईत अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याच निधन झाल्याचं समोर आलं आहे. कोल्हापूरमध्ये राहत्या घरीच रणजित यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
रणजित पाटीलच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून रणजीतच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. अनेक नवोदित कलाकार घडवण्यात रणजित पाटीलचा मोलाचा वाटा असल्याचे देखील बोलले जाते. कॉलेज काळात रजणीतला अभिनयाची आवड लागली. मुंबईतील अनेक एकांकिका स्पर्धा देखील रणजीत पाटीलने गाजवल्या आहेत.
रणजित पाटीलच्या दिग्दर्शनात कायम नाविन्य असल्याचे दिसून आले आहे. चौकट मोडून काढण्याचा प्रयत्न त्याने आपल्या प्रत्येक दिग्दर्शनात केला आहे. त्याच्या दिग्दर्शनात माणसांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवणारी मांडणी त्याच्या दिग्दर्शनात आढळते. त्यामुळे त्याची प्रत्येक कलाकृती मनोरंजनाचं माध्यम न राहता समजाला विचार करायला भाग पडणार एक सुंदर कलाकृती मानली जाते.
प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या जर तर ची गोष्ट’ या सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा देखील रणजित पाटीनेच सांभाळली आहे. नुकताच या नाटकाचा ३०० वा प्रयोग देखील पार पडला.
हे देखील वाचा – Fruits Good For Kidneys : मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी ही ५ फळे ठरू शकतात उपयुक्त









