Home / महाराष्ट्र / Farmers Loss : फुलांचे उत्पादन घटले; फुलांच्या शेतीतून उत्पादन खर्चही निघत नाही..

Farmers Loss : फुलांचे उत्पादन घटले; फुलांच्या शेतीतून उत्पादन खर्चही निघत नाही..

Farmers Loss : कोणता सण आला किच बाजारात फुलांना भारोगस प्रमाणावर मागणी असते. नुकत्याच झालेल्या दसरा सणांनंतर बाजारात फुलांच्या दरामध्ये...

By: Team Navakal
Farmers Loss

Farmers Loss : कोणता सण आला किच बाजारात फुलांना भारोगस प्रमाणावर मागणी असते. नुकत्याच झालेल्या दसरा सणांनंतर बाजारात फुलांच्या दरामध्ये मात्र मोठी घसरण झाली आहे. यामुळे फूल उत्पादक शेतकरी मात्र आर्थिक संकटात सापडले आहेत.

दसऱ्याच्या सणानंतर बाजारात फुलांच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली असून, फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या आधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं बरच नुकसान झालं होत आता दर घसरल्यामुळे फुलांच्या शेतीतून उत्पादन खर्चही वसूल होत नाही.

यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. पावसाळ्यात फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी राहिल्याने दर मात्र; गगनाला भिडले होते.

परंतु; सध्या फुलांची आवक वाढल्याने बाजारातील दर कोसळले आहेत. यामुळे तोडणी, वाहतूक आणि मजुरीचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत. दसऱ्याला मात्र फुलांना हवा तसा अपेक्षित दर मिळाला नाही त्यामुळे उत्पादकांना आता आशा आहे कि दिवाळीमध्ये थोड्या फार प्रमाणात फायदा होईल.
दिवाळीत गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंध यांची मागणी वाढण्याची शक्यता असून, त्यातून दरात काही प्रमाणात सुधारणा होईल, अशी अशा या वेळी फुल उप्तादकांना आहे.

फुलांचे आधीचे भाव आणि आताचे भाव:

काकडा हे फुल आधी ६०० रुपयाने विकले जात होते आणि आता २०० रुपये किलोने विकले जात आहेत. झेंडू या आधी १०० रुपये किमतीला विकले जात होते आणि आता ३० रुपये या किमतीत विकले जात आहेत. शेवंती हे फुल आधी १५० रुपये किमतीला होते आणि आता १०० रुपयाला विकले जात आहेत. गुलाब या आधी १०० रुपये किमतीला मिळत होते आणि आता ५० रुपये इतका भाव आहे. फुलांचा दरात सततचा चढ-उतार होत असल्याने विक्रेत्यांनाही तोटा सहन करावा लागतो आहे. सध्या दर इतके कमी आहेत की दिवसभर फुले विकूनही नफा हा होतच नाही आहे.


हे देखील वाचा –

Chewing Food 32 Times : ३२ वेळेला एक घास चावून खा! आयुर्वेद काय सांगत?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या