Home / महाराष्ट्र / मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ट्रेलरची १८-२० वाहनांना धडक; एकाचा मृत्यू

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; ट्रेलरची १८-२० वाहनांना धडक; एकाचा मृत्यू

मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai–Pune Expressway) खोपोलीजवळ आज दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास भीषण अपघात (Accident)झाला . खंडाळा घाटात...

By: Team Navakal
Fatal accident on Mumbai-Pune expressway

मुंबई – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai–Pune Expressway) खोपोलीजवळ आज दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास भीषण अपघात (Accident)झाला . खंडाळा घाटात मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रेलरच्या जोरदार धडकेत १८ ते २० वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, १ जणाचा मृत्यू झाला, तर २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

पुण्याकडून मुंबईकडे येणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक उतारावर फेल (brake fail) झाल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटले आणि तो समोरील वाहनांना धडक देत तसाच पुढे जात राहिला. दीड ते दोन किलोमीटरच्या पट्ट्यात या ट्रेलरने एकामागून एक वाहनांना धडक दिली. ज्यात लहान वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथके, पोलीस (Police) यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढून खोपोली आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात एक प्रवाशाचा मृत्यू झाला असून काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सध्या २५ प्रवाशांना खोपोली (Khopoli) येथील नगरपालिकेच्या रुग्णालयात आणले आहे. या दुर्घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या