Feeling Sleepy After Meals : ऋतू कोणताही असुद्या आळस येण हे सामान्यच. त्यात हिवाळा म्हटलं कि अधिक आळस येतो. आणि दुपारी जेवल्यानंतर चांगलीच सुस्ती येते. डोळे जाड होऊ लागतात आणि सुस्तपणा अधिक वाढतो. आणि आळसामुळे कामात नीट लक्ष लागत नाही. त्यामुळे कामात दिरंगाई होते. आपण सगळेच कुठे ना कुठेह या समस्येला तोंड देत असतो. पण या संदर्भातील अनेक हॅक देखील सोशल मीडियावर कमालीचे वायरल होताना दिसतात. यावरती डॉक्टर बऱ्याचदा उपाय सांगताना देखील दिसतात. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे जेवणानंतर आळस येतो, या समस्येपासून कायमची सुटका करून घ्यायची असेल तर हे उपाय नक्की करून पहा.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही दुपारच्या जेवणात पोळी, भात आणि गोड पदार्थांचा समावेश करत असाल तर शरीरामध्ये इन्सुलिनची पातळी अचानक अधिक वाढते. यामुळे शरीराला पटकन ऊर्जा मिळते तशीच ती ऊर्जा तितक्याच वेगाने कमी देखील होते. आणि त्यामुळे शरीराची ऊर्जा कमी झाल्यास झोप येऊ लागते.
जेवणामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा समावेश करू नये. जर तेलाचा जास्त प्रमाणात समावेश असेल तर अन्नाचे पचन करण्यास शरीराला जास्त प्रमाणात मेहनत करावी लागते. अशा परिस्थिती शरीराचे बहुतांश रक्त आणि ऊर्जा पोटाच्या दिशेने वाहत जाते. परिणामी मेंदूला ऑक्सिजनचा कमी प्रमाणात पुरवठा होतो आणि परिणामी सुस्तपणा अधिक जाणवू लागतो.
रात्री तुमची झोप पूर्ण झाली नसेल तर दुपारच्या जेवणानंतर शरीराला झोपेची गरज भासते त्यामुळेही झोप येऊ लागते.
काही लोकांना थोडेसे खाल्ल्यानंतरही लगेचच झोप येऊ लागते, यामागे अॅनिमिया (रक्ताची कमतरता) किंवा थॉयराइडची समस्या कारणीभूत असलायची शक्यता देखील असते. त्यामुळे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सुस्तपणा कमी करण्यासाठी दुपारचे जेवण पचनास हलके आणि पौष्टिक असावे. जास्त प्रमाणात कार्ब्स आणि तळलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश जेवणार करू नये.
जेवण केल्यानंतर ५ ते १० मिनिटे वॉक करावा. सात ते आठ तासांची व्यवस्थित झोप घ्यावी.
हे देखील वाचा –
OTT Releases : वीकेंड स्पेशल! ‘द फॅमिली मॅन S3’ सह OTT वर पाहा ‘हे’ 6 मोठे चित्रपट-वेब सीरिज









