Home / महाराष्ट्र / वैजापूरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या

वैजापूरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर तालुक्यातील चिंचडगावातील आश्रमात काल रात्री महिला कीर्तनकारची अज्ञात मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडाने ठेचून...

By: Team Navakal
Female Kirtankar Murdered

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूर तालुक्यातील चिंचडगावातील आश्रमात काल रात्री महिला कीर्तनकारची अज्ञात मारेकऱ्यांनी आश्रमात घुसून दगडाने ठेचून हत्या (Murder) केली. ह.भ.प. संगीताताई पवार (sangeeta pawar) असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या हत्येने संपूर्ण छत्रपती संभाजीनगरात मोठी खळबळ उडाली.

संगीता पवार या गेल्या दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्य करत होत्या. अविवाहित असलेल्या संगीता यांनी संन्यास घेतला होता. या परिसरात त्या कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध होत्या. त्या नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत असत. दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत. परंतु काल रात्री त्या पत्र्याच्या शेडमध्ये झोपल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री १२ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी संगीता पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांना आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वैजापूर व विरगाव पोलिसांना याची माहिती दिली.

याबाबत माहिती मिळताच वैजापूर पोलीस (Police) घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यात नक्की कोणाचा हात आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. घटनासथळी श्वान पथक बोलावून पुरावे शोधले जात आहेत. तसेच आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची पोलीस चौकशी सुरू केली आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या