Fight in two groups: दोन गटात राडा होण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. दर दिवशी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात हि अशी घटना घडतच असते. असाच एक राडा जळगावात सुद्धा झाला आहे. नवरात्र उत्सवानिमित्त देवी विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष झाला. या राड्यात एकूण १३ लोक जखमी झाले आहे. या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आाहे. सर्वांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
खेडी कढोली गावात काल सायंकाळी देवी विसर्जन मिरवणुकीवेळी दोन गटांतील किरकोळ बाचाबाची झाली. आणि या किरकोळ बाचाबाचीचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. या राड्यामुळे शहरात तणावाचे वातारण निर्माण झाले होते. यानंतर जखमींना रुग्णालयात आणले असता, तिथेही दोन्ही गटांकडून जमाव गोळा झाल्यामुळे परिस्थिती चांगलीच चिघळली. शहरातील परिस्थिती संवेदनशील बनल्यामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोठा बंदोबस्त तैनात केला
रुग्णालयाबाहेरील जमावाला आळा घालण्यासाठीशर्थीचे प्रयत्न केले. सध्या शहरातील संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुढे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सातत्याने गस्त ठेवण्यात येत आहे. जुन्या वैमनस्यातून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, पोलिसांनी या राड्यात सहभागी असणाऱ्या दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
हे देखील वाचा –
Unemployment News..धडकी भरवणार वास्तव! हजारो नोकऱ्या जाणार. टीसीएसनंतर आणखी ३००० कर्मचारी बेरोजगार?