मासळी मंडई स्थलांतर; मच्छिमारांचा मोर्चा स्थगित

Fish Market Migration Fishermen's March Suspended

मुंबई – मुंबई महापालिकेच्या (BMC) छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडईच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Fish Market shift) कायमच्या स्थलांतराच्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेल्या कोळी (Koli) समाजाने उद्याचा जनआक्रोश मोर्चा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा क्रॉफर्ड मार्केट (Crawford Market) ते महापालिका मुख्यालयापर्यंत निघणार होता. यासंदर्भात मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक कोळी समाजाच्या प्रतिनिधींनी काल मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. मासळी मार्केटवर लाखो मच्छिमार बांधवांचे उदरनिर्वाह चालतो, जवळपास २ हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होते याकडे मच्छिमार संघटनांनी लक्ष वेधले. नव्या मार्केट संदर्भातील विविध अडचणी आणि सूचना याबाबत त्यांनी मंत्री राणे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत मंत्री राणे यांनी स्थानिक कोळी समाजाच्या हिताचा विचार करूनच मासळी बाजाराचे पुनर्विकसन केले जाईल अशी ग्वाही दिली. महापालिकेशी यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाईल तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मच्छीमार बांधवांची भूमिका मांडली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या आश्वासनानंतर मच्छिमार संघटनांनी उद्या होणारा मोर्चा तूर्तास स्थगित केला.