Home / महाराष्ट्र / Fishermen Capital Loans : मच्छिमारांना भांडवली कर्जावर ४ टक्के व्याज परतावा मिळणार

Fishermen Capital Loans : मच्छिमारांना भांडवली कर्जावर ४ टक्के व्याज परतावा मिळणार

Fishermen Capital Loans – राज्यातील मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने आता मच्छिमार (Fisheries), मत्स्यसंवर्धक आणि मत्स्य कास्तकारांना मोठा...

By: Team Navakal
Fishermen Capital Loans
Social + WhatsApp CTA

Fishermen Capital Loans – राज्यातील मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्यात आल्याने आता मच्छिमार (Fisheries), मत्स्यसंवर्धक आणि मत्स्य कास्तकारांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता या लाभार्थ्यांना बँकांकडून मिळणाऱ्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर राज्य शासन ४ टक्के व्याज (4% interest)परतावा सवलत देणार आहे.

केंद्र सरकारच्या धोरणानुसार (central government policy)मच्छिमार व मत्स्य शेतकऱ्यांना (fish farmers) सात टक्के व्याजदराने अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. हे कर्ज एक वर्षाच्या आत परतफेड केले, तर केंद्र सरकार तीन टक्के व्याज परतावा देते. त्यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्षात चार टक्के व्याज भरावे लागते.

राज्य शासनाने आता यास पूरक योजना जाहीर केली आहे. त्यानुसार, एक वर्षाच्या आत कर्जफेड करणाऱ्या किसान क्रेडिट कार्ड धारक मच्छिमार, मत्स्य संवर्धक आणि मत्स्य कास्तकारांना ४ टक्के अतिरिक्त व्याज परतावा राज्य शासन देणार आहे.

या योजनेचा लाभ मच्छिमार, मत्स्यकास्तकार, मत्स्यउत्पादक, मत्स्यव्यवस्थापन करणारे, मत्स्यबीज संवर्धक (Fish seed developers), मत्स्यबोटुकली संवर्धन करणारे तसेच पोस्ट-हार्वेस्टिंग (Post-harvest activities)टप्प्यात वर्गीकरण, प्रतवारी, आवेष्ठन व साठवणूक (packaging)करणारे घटक घेऊ शकतात. अर्ज संबंधित बँकेमार्फत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे सादर करावा लागेल. कर्ज घेतल्यानंतर एक वर्षाच्या आत परतफेड अनिवार्य आहे. योजनेची अंमलबजावणी राष्ट्रीयकृत, खाजगी, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमार्फत करण्यात येणार आहे.


हे देखील वाचा –

सुप्रीम कोर्ट शुक्रवारी देणार भटक्या कुत्र्यांबद्दल आदेश!

शेलारांना आशिष कुरेशी म्हणावे उबाठा नेते अखिल चित्रेंची टीका

मतदार यादीच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या चारही याचिका

Web Title:
संबंधित बातम्या