Home / महाराष्ट्र / Leopard attack:भंडाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Leopard attack:भंडाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Leopard attack : भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने (Leopard attack ):भंडाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यूग्रामस्थांमध्ये भीती आणि...

By: Team Navakal
Leopard attack

Leopard attack : भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याने (Leopard attack ):भंडाऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यूग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोठणगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाजवळील संजय नगर येथे आज पहाटे पाच वाजताच्या सुमारस पाच वर्षीय वंश प्रकाश मंडल हा चिमुकला अंगणात लघुशंकेला गेला असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. जवळ असलेल्या आजीने आरडाओरडा केला, त्यामुळे परिसरातील लोक धावून आले.

मात्र तोपर्यंत बिबट्याने वंशला जंगलाकडे खेचत नेऊन मानेवर घाव केला होता. गोंधळ वाढताच बिबट्याने वंशला जागीच टाकून पसार झाला. गावकऱ्यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, केशोरी येथे नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गावकऱ्यांचा आरोप आहे की, बिबट्याने गेल्या काही दिवसांत गायी, वासरे आणि कोंबड्यांवर सतत हल्ले केले आहेत. याची माहिती वारंवार वन विभागाला दिली असूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही. उलट आता बिबट्याने लहान मुलांनाच लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. याआधीही अशा घटना घडल्या असून गोठणगाव येथील प्रदीप साखरे यांचा मुलगा, युक्ता चंद्रशेखर निखारे हिला ३० मे रोजी अंगणातून उचलून नेणे तसेच ३० ऑगस्ट रोजी दिनकरनगर येथील चार वर्षीय विहान रॉयवर इटियाडोह धरण परिसरात हल्ला करून गंभीर जखमी करणे या घटना घडल्या होत्या. आजची घटना ही चौथी मोठी घटना ठरली असून, त्यात वंश मंडल या चिमुकल्याचा बळी गेला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून हल्लेखोर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.


हे देखील वाचा

अंबाबाईच्या पूजेचे वर्णन संगीत खांबातून ऐकू येते

 मिग-२१ लढाऊ विमान उद्या निवृत्त होणार

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या