Home / महाराष्ट्र / Former Mayor Of Bhiwandi Arrested : भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Former Mayor Of Bhiwandi Arrested : भिवंडीचे माजी महापौर विलास पाटील यांना अटक; आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Former Mayor Of Bhiwandi Arrested : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे...

By: Team Navakal
Former Mayor Of Bhiwandi Arrested
Social + WhatsApp CTA

Former Mayor Of Bhiwandi Arrested : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आणि ‘कोणार्क विकास आघाडी’चे संस्थापक विलास आर. पाटील यांना ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) अटक केली आहे. एका जुन्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी
विलास पाटील आणि भाजपचे स्थानिक आमदार महेश चौगले यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. भिवंडी महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर उभय गटांतील तणाव शिगेला पोहोचला होता. विशेषतः १८ जानेवारी रोजी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या तीव्र संघर्षामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. या ‘राड्या’नंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.

आर्थिक गुन्हे शाखेचा फास
विलास पाटील यांनी भिवंडीचे महापौरपद भूषवले असून त्यांचा शहराच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे. मात्र, अलीकडच्या काळात त्यांच्यावर काही आर्थिक व्यवहारांतील अनियमिततेचे आरोप झाले होते. ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर अखेर त्यांना ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे कोणार्क विकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या अटकेमुळे भिवंडीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास पाटील यांची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी काळात या कारवाईचे पडसाद भिवंडीच्या स्थानिक राजकारणावर उमटणार, हे निश्चित मानले जात आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या