Home / महाराष्ट्र / Geeta Jain slap engineer: अभियंत्याला चापटी मारणे माजी आमदार गीता जैन यांना भोवले

Geeta Jain slap engineer: अभियंत्याला चापटी मारणे माजी आमदार गीता जैन यांना भोवले

Geeta Jain slap engineer: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला (engineer) सार्वजनिक ठिकाणी चापटी मारल्याप्रकरणी भाजपाच्या (BJP) तत्कालीन आमदार गीता जैन (Geeta...

By: Team Navakal
Geeta Jain slap engineer
Social + WhatsApp CTA

Geeta Jain slap engineer: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला (engineer) सार्वजनिक ठिकाणी चापटी मारल्याप्रकरणी भाजपाच्या (BJP) तत्कालीन आमदार गीता जैन (Geeta Jain) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश न्यायालयाने (court) दिले आहेत. २०२३ मध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Video viral) झाल्यानंतर आम आदमी पक्षाने केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने हा निर्णय दिला.त्यामुळे गीता जैन अडचणीत आल्या आहेत.

२०२३ रोजी मिरा रोड परिसरातील पेणकर येथील कक्कड इमारतीलगत मनपाच्या अतिक्रमण विभागाने झोपडपट्टी भागातील काही बांधकामांवर तोडक कारवाई केली होती. या कारवाईमुळे महिलांसह लहान मुले पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्यावर आली होती. या घटनेची माहिती मिळताच गीता जैन घटनास्थळी पोहोचल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईबाबत फैलावर घेतले.

याप्रसंगी कनिष्ठ अभियंता शुभम पाटील हसत हसत उत्तर देत असल्याचे पाहून संतापलेल्या जैन यांनी पाटील यांना चापटी मारली आणि त्याचा कॉलर धरून त्यांच्या अंगावर खेकसल्या होत्या. ही संपूर्ण घटना उपस्थित नागरिकांनी मोबाईलमध्ये टिपली आणि काही वेळातच तो व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर गीता जैन यांनी आपल्या कृतीबाबत खेद व्यक्त करत म्हटले होते की, महिलांच्या डोळ्यांतून अश्रू येत असताना तो अधिकारी हसत होता. ते पाहून माझा ताबा सुटला. मी कायदा मोडला हे मला मान्य आहे. पण ती कृती त्या क्षणी अनवधानाने झाली.


हे देखील वाचा –

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निधीसाठी केंद्र-राज्य सरकार कटिबद्ध ; फडणवीस यांचे आश्वासन

नारायण राणेंनी शिवसेना सोडली त्यावेळी झालेल्या दंगलीतील सर्व निर्दोष

नक्की कोणते वक्तव्य शिस्त्र भंगकरणारे? ठोंबरेंचा पक्षाला सवाल

Web Title:
For more updates: , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या