Home / महाराष्ट्र / Pigeon Shelters : मुंबईत कबुतरखान्यांसाठी चार नव्या जागांचा विचार

Pigeon Shelters : मुंबईत कबुतरखान्यांसाठी चार नव्या जागांचा विचार

Pigeon Shelters -मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation)आता चार ठिकाणी मर्यादित स्वरूपात कबुतरखाने सुरू करण्याचा विचार करत...

By: Team Navakal
Pigeon

Pigeon Shelters -मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर मुंबई महापालिका (Brihanmumbai Municipal Corporation)आता चार ठिकाणी मर्यादित स्वरूपात कबुतरखाने सुरू करण्याचा विचार करत आहे. यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर (Sanjay Gandhi National Park), आरे मिल्क कॉलनी (Aarey Milk Colony), वडाळ्याजवळील खारफुटी पट्टा आणि गोराई (Gorai)परिसराचा समावेश आहे.

उच्च न्यायालयाने (Bombay High Court)सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय दिल्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील कबुतरखाने बंद केले. यानंतर जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेत पुन्हा कबुतरखाने सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच कबुतरखान्यांसाठी पर्यायी जागा देण्याची मागणी केली होती. यानंतर पालिकेच्या विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना कबुतरखान्यांसाठी संभाव्य जागांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

त्यावर मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसर, आरे मिल्क कॉलनी, वडाळ्याजवळील खारफुटी पट्टा (Mangrove belt near Wadala)आणि गोराई परिसर या चार ठिकाणांचा विचार करण्यात आला. या ठिकाणी मानवी वस्ती नसल्याने कबुतरखाने खाने स्थापन करण्यासाठी या जागा योग्य असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कबुतरखान्यासाठी निश्चित केलेली जागा उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना आरे कॉलनीकडून उद्यानाला देण्यात आलेल्या ७०० एकर जागेपैकी आहे. पर्यावरणवाद्यांनी या निर्णयावर टीका केली आहे. आरेमधील भागात आदिवासी राहतात आणि तेथे मानवी वस्ती नाही असे म्हणता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.


हे देखील वाचा –

तटकरेंचा शेवटचा हिशोब चुकता करणार! आमदार दळवींचा इशारा

राज ठाकरेंचा मोठा इशारा! शिवरायांच्या किल्ल्यांवर ‘नमो पर्यटन केंद्र’ उभारल्यास फोडून टाकणार

अलीगढच्या मंदिरावर हिंदूंनीच ‘आय लव्ह मोहंमद ‘ लिहिले

Web Title:
संबंधित बातम्या