Electric water taxi- देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी युक्त अशी इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा येत्या २२ सप्टेंबरपासून मुंबईत (Mumbai)सुरू होणार आहे. गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India)ते जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी (Jawaharlal Nehru Port Authority)अर्थात जेएनपीएपर्यंत ही इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी नियमित चालणार आहे.
या नव्या सागरी वाहतूक सुविधेमुळे मुंबईतील प्रवासाला एक नवीन आणि पर्यावरणपूरक (eco-friendly travel)पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या या मार्गावर साध्या बोटी जात असून प्रवासाला साधारण एक तासाहून अधिक वेळ लागतो आणि भाडे प्रति प्रवासी १०० रुपये (₹100 per passenger)आहे. नवीन इलेक्ट्रिक बोटींमुळे प्रवासाचा वेळ ४० मिनिटे होणार आहे.
भारत फ्रेट ग्रुपचे मालक सोहेल कझानी (Owner of Bharat Freight Group Sohail Kazani)यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात दोन बोटी सुरू केल्या जातील.यापैकी एक हायब्रिड बोट असून ती सौरऊर्जा, इलेक्ट्रिक बॅटरी आणि डिझेल बॅकअपवर चालेल, तर दुसरी पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल. दोन्ही बोटी एका तासाच्या आत चार्ज करता येऊ शकतील.पुढील टप्प्यात जनरेटर बसवल्यानंतर चार हायड्रोजनवर चालणाऱ्या बोटी सेवेत दाखल होतील. माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Shipbuilders)आणि बीएफजी यांच्या भागीदारीत बांधलेल्या या वॉटर टॅक्सीमध्ये आलिशान सोफा-सीट (२०), वातानुकूलन,अत्याधुनिक नेव्हिगेशन सिस्टम आणि लक्झरी प्रवासासाठी खास डिझाइन केलेले इंटीरियर आहे. १० नॉटिकल मैल प्रतितास या वेगाने धावणाऱ्या या बोटींमध्ये २ x २५ किलोवॉट मोटर आणि ६० किलोवॉट पॉवरपॅक आहेत.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना दिले 20 आश्वासनांचे हमीपत्र, जाणून घ्या काय आहेत अटी-शर्ती
15 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे बेस्ट लॅपटॉप ; वाचा फीचर्स आणि किंमत
Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा