Home / मनोरंजन / Gautami Patil : गौतमी पाटीलने अपघातानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया..रिक्षाचालकांच्या कुटुंबियांना भेटणार नाही

Gautami Patil : गौतमी पाटीलने अपघातानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया..रिक्षाचालकांच्या कुटुंबियांना भेटणार नाही

Gautami Patil : पुण्यात गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वाहनच ३० सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ गौतमीच्या...

By: Team Navakal
Gautami Patil

Gautami Patil : पुण्यात गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) वाहनच ३० सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ गौतमीच्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षातील (Auto) दोन व्यक्ती देखील जखमी झाल्याची माहिती होती. या प्रकरणादरम्यान गौतमी पाटील चांगलीच ट्रॉल देखील झाली.

या प्रकरणात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली होती. अपघातावेळी गौतमी पाटील वाहनात नव्हतीच, अशी माहिती देखील पुणे पोलिसांच्या तपासातून समोर आली होती. यासाठी पुणे पोलिसांनी १०० हुन अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. या सगळ्याप्रकरणात गौतमी पाटीलला पुणे पोलिसांनी क्लीन चीट दिली देखील दिली.

यावर आता गौतमीने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तिला अश्रू अनावर झाले होते. ती म्हणते “अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते., कार

माझ्या कारचालकाकडे होती. याशिवाय मला जेव्हा समजलं की अपघात झाला तेव्हा मी मदतीचा हात देखील पुढे केला होता. या संदर्भात मी संबंधित रिक्षावाल्यांच्या कुटुंबीयांना मदतही पाठवली. मात्र त्यांच्याकडून ती मदत नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं की जे काही आहे ते आपण कायदेशीर करु. म्हणून मग आता सगळं कायदेशीर मार्गानेच होऊदे असं गौतमी पाटीलने म्हटलं. मी अतिशय गरीब घरातून आलेली मुलगी आहे. पहाटे साधारण पाचच्या सुमारास अपघात झाला त्यानंतर दुपारी माझं बोलणं देखील झालं होतं. मात्र त्यांनी मदत नाकारली, यासगळ्या गोष्टींमुळे मी गप्प होते. पण त्यानंतर मात्र मला उगीच ट्रॉल करण्यात आल. ज्या ठिकाणी माझा काहीच संबंध नाही, तिथे माझं नाव गोवलं जात आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिल.याबद्दलची माहिती मी सार्वजनिक केली पाहिजे असं मला वाटत नाही. कायदेशीर मार्गाने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी करते आहे. मी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले नाही हे खर आहे. कारण माझ्या कार्यक्रमाच्या तारखा आधी ठरलेल्या असतात. समोरुन मला अॅडव्हान्स येतो, खर्च देखील खूप झालेला असतो. त्यामुळे मी माझी कामं रद्द करु शकत नाही. परंतु काही दिवसांपासून मला बरच ट्रॉल केलं गेलं.

रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मी भेटायला जाणार नाही..

अपघात झाला हे खरच खूपच वाईट झालं, पण मी त्या कुटुंबीयांना भेटायला जाईन अस मला वाटत नाही. कारण माझ्याबाबतीत ज्या काही गोष्टी त्यांनी पसरवल्या आहेत याचा मला प्रचंड प्रमाणात त्रास झाला आहे. त्यामुळे मी दुखावले आहे. म्हणून मला नाही वाटत की मी त्या कुटुंबाला भेटायला जाईन.


हे देखील वाचा –

एअर इंडियाच्या विमानाला धडकला पक्षी ! १५८ प्रवासी बचावले..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या