Girish Mahajan : नाशिकचा कुंभमेळा महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. कुंभमेळा आणि वाद फारसा तसा काही संभंध कधी आलाच नाही. आता पर्यंत कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांची निवास व्यवस्था तपोवनातच केली जाते. हा परिसर म्हणजे साधूनच गाव म्हणून देखील आता ओळखला जातो. कुंभमेळ्यातील अमृत पर्वात स्नानासाठी साधू, महंत रामकुंडाकडे वळतात. रामकुंडापर्यंत त्यांना तपोवनातून येणेच सोयिस्कर ठरते. तपोवनापासून रामकुंडापर्यंतचे अंतरही तसे पाहायला गेले तर फारसे नाही. तसेच पौराणिक काळी साधू, महंतांनी त्या ठिकाणी तपश्चर्या केली होती. त्यामुळेच तपोवनाची ओळख असल्याने आधुनिक काळातही साधू, महंतांची कुंभमेळ्यात वास्तव्यासाठी तपोवनालाच पसंती असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येक कुंभमेळ्यात तपोवनातच साधू, महंतांच्या निवासाची सोय हि केली जाते.
परंतु आता येणाऱ्या कुंभमेळ्यात सुमारे चार लाखांहून अधिक साधू-महंंत साधुग्राममध्ये वास्तव्यास येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अतिशय मोठ्या संख्येने येणाऱ्या साधू महंतांची निवासी व्यवस्था करणे या वेळी कठीण असल्याचे दिसून येत होते. इतक्या मोठ्या संख्येने येणाऱ्या साधू, महंतांची निवास व्यवस्था करण्यासाठी तपोवनातील नेहमीची जागा तोकडी पडत असल्याचे निदर्शनात आले. तरी नियोजित साधूग्रामसाठी तपोवनातील १८०० झाडे तोडली जाणार या बातमीने नाशिककरांसह राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली.
आणि उभा राहिला न्यायाचा लढा. पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांचा वाढता रोष पाहता, आता राज्य सरकारने तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ करायला सुरवात केली आहे. तपोवनातील एकाही झाडाला हात लावण्यापूर्वी शहरात तब्बल १५ हजार देशी वृक्षांची लागवड केली जाईल, महत्त्वपूर्ण असा निर्णय कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, यासाठी थेट दक्षिण भारतातील ‘राजमुद्री’ (आंध्र प्रदेश) येथून १५ फूट उंचीची झाडे देखील मागवण्यात येत आहेत.
कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंतांच्या तात्पुरत्या निवासासाठी सुमारे ११५० एकरांवर साधूग्राम उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे; मात्र, यासाठी तपोवन परिसरातील १८०० झाडे अडथळा ठरत असल्याचे बोलले जात आहेत त्यामुळे ती झाडे तोडण्याचा प्रस्ताव देखील पुढे आला. या विरोधात पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना आणि काही सेलिब्रिटींनी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरू केली असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने आता वृक्षारोपणाचे मोठे मिशन हाती घेतले असल्याचे चित्र आता दिसत आहे. आणि यासाठी गिरीश महाजन हे राजमुद्री येथे दाखल झाले आहेत.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः आंध्र प्रदेशातील राजमुद्री येथे जाऊन नर्सरीची पाहणी करताना दिसत आहेत. तेथून वड, पिंपळ, लिंब, जांभूळ आणि आंबा यांसारखी १५ फूट उंचीची १५ हजार पूर्ण वाढ झालेली झाडे निवडली गेली आहेत. यातील पहिली खेप म्हणून एक ते दोन हजार झाडे येत्या आठवडाभरातच नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. मनपा उद्यान विभागामार्फत ठिबक सिंचन आणि सेंद्रिय खतांचा वापर करून या वृक्षांचे जतन देखील केले जाणार आहे.
याबाबत अधिक स्पष्टता देताना महाजन म्हणाले की, “साधूग्रामच्या जागेवरील एक्झिबिशन सेंटरचे टेंडर रद्द केले आहे. आधी शहरात १५ हजार नवीन वृक्ष लावू, त्यानंतरच तपोवनातील झाडांबाबत विचार केला जाईल. तोडण्याऐवजी जास्तीत जास्त झाडांचे पुनर्रोपण करण्यावर आमचा भर असेल.” असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, वृक्षतोडीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने आंदोलकांना चर्चेचे निमंत्रण दिले जाणार आहे. उद्या होणाऱ्या या बैठकीत प्रशासनाची भूमिका आणि पर्यावरणप्रेमींच्या मागण्या यावर सविस्तर चर्चा होईल. त्यामुळे हे प्रकरण कोणतं नवीन वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हे देखील वाचा – Top Phone 2025 : या वर्षातले टॉप ५ सेल्फी फोन









