Home / महाराष्ट्र / Gondia Crime : नोकरीच्या आड बाळ येत होत म्हणून बाळाला संपण्याचा रचला कट; आईनेच घेतला २० दिवसाच्या बाळाचा जीव

Gondia Crime : नोकरीच्या आड बाळ येत होत म्हणून बाळाला संपण्याचा रचला कट; आईनेच घेतला २० दिवसाच्या बाळाचा जीव

Gondia Crime : गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली येथे मातृत्वाला गाल बोट लावणारी एक भयानक घटना घडली आहे. २० दिवसांच्या बालकाचा खून...

By: Team Navakal
Gondia Crime
Social + WhatsApp CTA

Gondia Crime : गोंदिया तालुक्यातील डांगोर्ली येथे मातृत्वाला गाल बोट लावणारी एक भयानक घटना घडली आहे. २० दिवसांच्या बालकाचा खून जन्मदात्या आईनेच केल्याचा धक्कादायक उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने केवळ २४ तासांत केला आहे. पोलिसांनी अपहरणाची बनावट तक्रार देणारी आई रिया राजेंद्रसिंह फाये वय २२ वर्ष हिला अटक केली आहे. १८ नोव्हेंबर रोजी रिया फायेने रावणवाडी पोलिस ठाण्यात मुलगा विराजचे अज्ञात व्यक्तीने अपहरण झाल्याची खोटी फिर्याद दाखल केली होती.

या तक्रारीत १७ नोव्हेंबरच्या रात्री १०:१५ वाजता एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून बाळाला पळवून नेल्याची तक्रार केली होती. तिच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंद केला होता, शिवाय गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेत तपास युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या २४ तासात या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला.

पोलिसांनी घटनास्थळाच्या बारकाई निरीक्षणातून महत्त्वाचे धागेदोरे मिळविले. तपासादरम्यान फिर्यादीचे वक्तव्य वारंवार बदलणे, घटनास्थळी जबरदस्तीचा कोणताही पुरावा न मिळणे, घरातील परिस्थितीत संशयास्पद या सर्व कारणांमुळे बाळाच्या आईवरच पोलिसांचा संशय अधिक बळावला. रीयाला ताब्यात घेत कठोर चौकशी करताच आणि पाेलिसी खाक्या दाखविताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

चौकशी दरम्यान मोठे खुलासे –
चौकशी दरम्यान रियाने सांगितले की मला कायमच नोकरी करायची होती. आणि याच्या आड बाळ येत होत. आणि पतीने गर्भपात करू दिला नाही. बाळामुळे घरात अडकून पडले होते म्हणून त्याला मी संपवायचं ठरवलं. १७ नोव्हेंबरच्या रात्री १०:३० वाजता घरचे सर्व गाढ झोपले असताना तिने मुलगा विराजला घेतले आणि, मागच्या दाराने बाहेर जाऊन थेट वैनगंगा नदीच्या पुलावरून पाण्यात फेकल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला.

आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी तत्काळ नदीकाठी शोधमोहीम सुरू हाती घेतली. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर वैनगंगा नदीतील पुलाखाली विराजचा मृतदेह सापडला. या घटनेने परिसरात मात्र शोक पसरला होता.

हे देखील वाचा –

India Women’s Team : वोग इंडियाच्या मुखपृष्ठावर भारतीय महिला क्रिकेटपटूंची झलक

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या