Google Pixel 9 Pro Fold Price : नवीन फोन म्हटलं कि सगळ्यांचाच उत्साह शिगेला असतो. अनेक सणांमध्ये बरीच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सेल्स असतात. दिवाळीतही बरेच सेल्स लागले होते. मात्र आत दिवाळीनंतर अनेक सेल संपले आहेत. फोने सारख्या गोष्टी घेण्यासाठी आपण आधी बराच अभ्यास करतो तो फोने कसा आहे किंमत काय आहे. हे सगळं प्लॅनिंग आधी केलं असेल तर बर नंतर मग या सगळ्याचे ऑफर निघून जाते. तशीच एक ऑफर दिवाळीत तुमची सुद्धा सुटली का, आणि तरीही तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर नक्की जाणून घ्या. गुगल पिक्सेल ९ प्रो फोल्ड (Google Pixel 9 Pro Fold) वर आता सूट मिळत आहे. तुम्ही तब्बल ५३,००० रुपये वाचवू हा फोने घेऊ शकता.
Google Pixel 9 Pro Fold: किंमत फ्लिपकार्टवर किती?
फ्लिपकार्टवर सध्या Google Pixel 9 Pro Fold ची किंमत १,१९,९९९ रुपये इतकी ठेवली आहे, जी मूळ किंमत १,७२,९९९ रुपयांवरून कमी आहे, ज्या वर सरळ ५३,००० रुपयांची सूट आहे. तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक किंवा एसबीआय क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्ही अतिरिक्त ४,००० रुपयांची सूट देखील मिळवू शकता, ज्यामुळे किंमत १,१५,९००० रुपयांवर येऊ शकते. प्रीमियम फोल्डेबल डिव्हाइसवर ५७,००० रुपयांची मोठी बचत होते.
अधिक बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी, फ्लिपकार्ट आपल्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती बघून आणि मॉडेलनुसार ६०,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज बेनिफिट्स सुद्धा देत आहे. हे लक्षात घेणे जास्त गरजेचे आहे की अंतिम विनिमय मूल्य डिव्हाइसची स्थिती, स्क्रीन गुणवत्ता आणि कार्यक्षमता यासारख्या घटकांवर अवलंबून असेल.

याच्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर ,Google Pixel 9 Pro Fold मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि २,७०० निट्सच्या पीक ब्राइटनेससह ६.३ -इंच OLED कव्हर डिस्प्ले देखील आहे. जो गोरिल्ला ग्लास विक्टस २ द्वारे संरक्षित असल्याचे दिसून येते. ते उघडा आणि आपल्याला ८-इंच OLED मुख्य स्क्रीनद्वारे स्वागत केले जाईल, तसेच 120Hz रिफ्रेश रेटसह. Google Pixel 9 Pro Fold या फोनमध्ये ४५ वॉट फास्ट चार्जिंगसह 4650mAh क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे.
कॅमेऱ्याच्या आघाडीवर Google Pixel 9 Pro Fold मध्ये OIS सह ४८ – मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सर आहे, १०.०५ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि १०.०८ मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी, यात ड्युअल १०-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरे आहेत ज्यात शार्प आणि संतुलित शॉट्स येतात. हे डिव्हाईस ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन या दोन शेड्समध्ये सध्या उपलब्ध आहे.
हे देखील वाचा – Maharashtra Weather : राज्यात बघायला मिळतोय तिन्ही ऋतूंचा संगम..कस असेल वातावरण?
 
								 
								 
								 
								 
								 
				 
															 
								 
								 
								 
								 
								 
								








