Home / महाराष्ट्र / Government on farmers : राज्यसरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर;

Government on farmers : राज्यसरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर;

Government on farmers : शेतकरी म्हणजे उभ्या जगाचा पोशिंदा असं म्हटलं जात. पण गेले कित्येक महिने हा पोशिंदा दुःखात होता....

By: Team Navakal
Government on farmers

Government on farmers : शेतकरी म्हणजे उभ्या जगाचा पोशिंदा असं म्हटलं जात. पण गेले कित्येक महिने हा पोशिंदा दुःखात होता. आपलं शेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी (Farmer) त्याच्या पोटच्या पोराप्रमाणे असत. या परिस्थितीत पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, पीक पाण्याखाली गेले, या सगळ्या आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. यांची संपूर्ण भरपाई जरी सरकार देऊ शकल नाही तरीही शेतकऱ्याला त्याच उमेदीने पुन्हा उभं करण्यासाठी सरकारने एक  विशिष्ठ पॅकेज जाहीर केलं आहे.  ६८ लाख ६९ हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले.त्यामध्ये २९ जिल्हे आणि २५३ तालुके हे सरसकट मदतीच्या पॅकेजमध्ये घेतले गेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या त्या ठिकाणी अटी शिथिल करून मदत केली जाणार आहे. राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी(farmer) जार ६२८ कोटीं इतकी मदत जाहीर केली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया

परिषदे दरम्यान मुख्यमंत्री म्हणाले कि घरांची पडझड झाली, तिथे घरे उभारली जाणार आहेत. ५० हजार रूपयांची मदत दुकानदारांना मिळेल. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ जनावरांची अट रद्द केली गेली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाणार आहे. नष्ट झालेली जमीन आहे तिथे ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार आहोत. ज्या विहिरींचे नुकसान झाले आहे तिथे विशेष बाब म्हणून ३० हजार रूपये प्रति विहीर भरपाई दिले जाणार आहे. ज्या ठिकाणी पायाभूत सुविधांचे नुकसान झाले तिथे १० हजार कोटी मदत देखील त्यांनी जाहीर केली आहे.


हे देखील वाचा –

Uddhav Thackeray Vs Eknath shinde- शिवसेना कोणाची हा वाद उद्या थांबणार? अखेर शिवसेना कोणाची सुप्रीम कोर्टात उद्या होणार अंतिम सुनावणी

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या