Home / महाराष्ट्र / MP Sanjay Raut : सरकार मराठी माणसांना मारायला निघाले! संजय राऊतांचा घणाघात

MP Sanjay Raut : सरकार मराठी माणसांना मारायला निघाले! संजय राऊतांचा घणाघात

MP Sanjay Raut

MP Sanjay Raut : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी आज केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांचे सरकार हे मराठी माणसाला मारायलाच निघाले आहे, असा घणाघात त्यांनी केला.

मुंबईत पत्रकार परिषद बोलताना राऊत म्हणाले, लोक प्रश्न विचारतील या भीतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy CM Eknath Shinde)दरेगावात जाऊन स्वतःला कोंडून घेत आहेत. कालच देशाचे गृहमंत्री अमित शहा मुंबईत आले होते. त्यांच्याबरोबर भाजपचे सगळे लटांबर (BJP leaders) आणि उपमुख्यमंत्री फिरत होते. हजारो लोक मुंबईत आंदोलन करत आहेत आणि तो विषय केंद्राशी संबंधित आहे. आमची अपेक्षा होती की गृहमंत्री आझाद मैदानावर जातील, जरांगे पाटील यांना दिलासा देतील आणि तोडगा काढतील. पण तसे झाले नाही.

राऊतांनी आरोप केला, की ज्यांनी कश्मीरचा प्रश्न सोडवला, कलम ३७० हटवले, घटनेत बदल केले तेच गृहमंत्री मराठा समाजाच्या न्यायहक्कासाठी बदल करू शकत होते. त्यांनाही याचे श्रेय घेता आले असते. पण त्यांनी ते केले नाही. मुंबईत येऊन त्यांनी कार्यकर्त्यांना एवढेच सांगितले, की मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे. हे अतिशय दुर्दैवी आहे. शहा आणि फडणवीसांचे सरकार हे मराठी बांधवांना मारायलाच आले आहे. यांच्या पोटात एक आणि ओठावर एक असते. मराठी माणसांच्या बाबतीत शहांचे वर्तन अमानुष आणि क्रूर आहे.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

मुंबईत आंदोलनादरम्यान आणखी एका मराठा आंदोलकाचा मृत्यू

मराठा आंदोलकांसाठी ठाकरे सेनेकडून जेवण

मराठा समाज मागासलेला नाही! चंद्रकांत पाटलांचे विधान वादात