Healthy Cold Drinks : महाराष्ट्रात उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांना उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत शरीर थंड ठेवणे आणि पाण्याचे प्रमाण योग्य राखणे अत्यावश्यक ठरते. यासाठी बाजारातील थंड पेयांपेक्षा घरच्या घरी तयार केलेली पारंपरिक शीतपेये अधिक फायदेशीर ठरतात.
आम पन्हा, लिंबू सरबत, ताक आणि कोकम सरबत यांसारखी पेये केवळ तहान भागवत नाहीत, तर शरीराला आवश्यक खनिजे आणि ऊर्जा देखील पुरवतात. विशेषतः आम पन्हा आणि कोकम सरबत हे उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करण्यात प्रभावी मानले जातात.
तज्ज्ञांच्या मते, दिवसाला किमान ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर साखरयुक्त आणि कार्बोनेटेड पेय टाळून नैसर्गिक पेयांचा वापर केल्यास शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यास मदत होते.
आम पन्हा रेसिपी (स्टेप-बाय-स्टेप):
साहित्य:
2-3 कच्च्या कैऱ्या
4-5 चमचे साखर (चवीनुसार)
1 चमचा भाजलेले जिरे पूड
चिमूटभर मीठ
पाणी
कृती:
कच्च्या कैऱ्या उकळून घ्या किंवा भाजून घ्या.
त्याची साल काढून गर वेगळा करा.
गरात साखर, मीठ आणि जिरे पूड घालून मिक्सरमध्ये फिरवा.
तयार पेस्ट पाण्यात मिसळा आणि नीट ढवळा.
थंड करून सर्व्ह करा.
टीप: आवडीनुसार पुदिन्याची पाने घातल्यास चव अधिक छान लागते.
लिंबू सरबत रेसिपी:
साहित्य:
1 लिंबू
1 ग्लास पाणी
2 चमचे साखर
चिमूटभर मीठ
कृती:
पाण्यात लिंबाचा रस काढा.
त्यात साखर आणि मीठ घालून ढवळा.
थंड करून प्या.
कोकम सरबत रेसिपी:
साहित्य:
8-10 कोकम
साखर
मीठ
पाणी
कृती:
कोकम पाण्यात भिजवून ठेवा.
मऊ झाल्यावर चांगले मॅश करा.
त्यात साखर आणि मीठ घालून गाळून घ्या.
थंड पाण्यात मिसळून सर्व्ह करा.
टोमॅटो व काकडी सरबत:
साहित्य:
टोमॅटो ज्यूस, लिंबाचा रस, लवंगा, दालचिनी, कांदा, काकडी, मीठ, साखर, बर्फ
कृती:
कांदा व काकडी किसून घ्या
सर्व घटक (बर्फ वगळून) एकत्र करून १ तास फ्रीजमध्ये ठेवा
नंतर गाळून ग्लासमध्ये घ्या
बर्फ टाकून सर्व्ह करा
कलिंगडचे सरबत:
साहित्य:
कलिंगड, मीठ, साखर, मिरपूड/दालचिनी, लिंबाचा रस
कृती:
कलिंगडाचा गर काढून रस तयार करा
बिया काढून गाळून घ्या
त्यात मीठ, साखर, मिरपूड/दालचिनी व लिंबू घाला
थंड करून सर्व्ह करा (बर्फ न घालणे योग्य)
सफरचंदाचे पेय:
साहित्य:
सफरचंद, साखर, लिंबू, मीठ
कृती:
सफरचंद चिरून त्यात लिंबाची साल व साखर मिसळा
गरम पाणी घालून झाकून ठेवा
थंड झाल्यावर गाळून साखर व मीठ घाला
बर्फ टाकून सर्व्ह करा
जिंजरेल:
साहित्य:
आल्याचा रस, लिंबाचा रस, साखर, पाणी
कृती:
साखर व पाणी उकळून गार करा
त्यात आल्याचा व लिंबाचा रस मिसळा
सर्व्ह करताना बर्फ व सोडा/पाणी घालून द्या
नारळ पाणी:
ताजे नारळ पाणी थेट पिणे अधिक फायदेशीर
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते
गुलकंद पाणी:
कृती:
गोंद कतीरा रात्रभर भिजवा
दुसऱ्या दिवशी पाण्यात गुलकंद मिसळा
त्यात गोंद कतीरा घालून थंड पेय तयार करा










