Home / आरोग्य / Healthy Tips : जेवणाचे सेवन करताना तुम्ही सुद्धा या चुका करता का? तस असेल तर आताच थांबा!

Healthy Tips : जेवणाचे सेवन करताना तुम्ही सुद्धा या चुका करता का? तस असेल तर आताच थांबा!

Healthy Tips : आज कालच्या बदलत्या जीवनशैली आणि बदलत्या सवयी यामुळे अनेकदा शरीरावर परिणाम होतो. अनेकजण जेवणादरम्यान पाणी पितात किंवा...

By: Team Navakal
Healthy Tips

Healthy Tips : आज कालच्या बदलत्या जीवनशैली आणि बदलत्या सवयी यामुळे अनेकदा शरीरावर परिणाम होतो. अनेकजण जेवणादरम्यान पाणी पितात किंवा जेवण झाल्यावर लगेच मोठ्या प्रमाणात पाणी प्यायला लागतात, पण आयुर्वेदानुसार हे आरोग्यासाठी चांगलं आहेच अस नाही. या सवयीनमुळे जेवणानंतर पचन प्रक्रिया मंदावू शकते, पोषण शोषणावर परिणाम होतो आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर पडण्यास यामुळे अडथळा निर्माण होतो. प्रत्येकाची शरीररचना वेगळी असल्यामुळे पाणी पिण्याच्या सवयी देखील भिन्न असतात.

योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने पाणी पिण्याचे काही नियम पाळल्यास शरीराची ऊर्जा टिकून राहते, थकवा कमी जाणवतो आणि त्वचा तजेलदार राहण्यास मदत मिळते. थोडक्यात, पाणी ही फक्त तहान भागवण्यासाठीची गोष्ट नसून शरीराच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. चुकीच्या वेळेला पाणी पिऊन आपण आपल्या पचन संस्थेवर विचित्र परिणाम होत आहे.

वात प्रकृती असलेल्या व्यक्तींनी जेवणानंतर उबदार पाणी पिणे आवश्यक आहे. वाताचे गुण थंड आणि कोरडे असल्यामुळे उबदार पाणी पचनप्रक्रिया सुलभ होण्यास मदत करते, शरीरातील ऊर्जेचे संतुलन राखते आणि पोट हलके करायला देखील मदत करते. नियमित पाणी प्यायल्यास वातदोष नियंत्रित राहतो, आणि स्नायूंचे ताण कमी होतो यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती देखील टिकून राहते. जेवणानंतर लगेच थंड पाणी प्यायल्यास पचन मंद होते, पोषण शोषण कमी होते आणि शरीरात जडत्व देखील निर्माण होते.

पित्त प्रकृती असलेल्या लोकांनी मसालेदार जेवणानंतर सामान्य तापमानाचे पाणी पिणे अधिक उपयुक्त ठरते. पित्तातील उष्णतेमुळे पचन प्रक्रियेत अधिकच ताण येणायची जास्त शक्यता असते, त्यामुळे थंड पाणी पचन मंद करते. उबदार किंवा तापमानाशी संतुलित पाणी पचनावर सकारात्मक परिणाम दाखवते, शरीरातील उष्णतेचे संतुलन राखते आणि जठराच्या आजारांचा धोका देखील कमी करते.

ज्यांना वारंवार कफ संदर्भात समस्या असतील त्यांनी उबदार किंवा आले घातलेले पाणी पियावे त्यामुळे कफच्या जड गुणांना संतुलित ठेवते आणि शरीर हलके वाटते. नियमित[पणे पाणी प्यायल्यास जडत्व कमी होते, पोट स्वच्छ राहते आणि प्रतिकारशक्ती अधिक वाढते. तसेच, शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि स्नायूंवरचा ताण कमी होण्यास मदत होते.

काही जण जेवत असताना पाण्याचे सेवन करतात यामुळे देखील पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो बऱ्याचदा एक घास खाल्यानंरच काही जण पाणी पितात अश्यावेळी जेवणायच्या मध्येच पाणी पियाल्याने अर्धवट पोट भरते. पाणी योग्य तापमानात, योग्य वेळेत प्यायल्यास पचन सुधारते, वजन देखील नियंत्रणात राहते. आयुर्वेद सांगतो की शरीराचे संकेत ऐकून पाणी पिण्याचे संतुलन राखणे हे दीर्घकालीन आरोग्याचे रहस्य आहे.

हे देखील वाचा – Manoj Jarange : मनोज जरांगेचा सरकारला इशारा.. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन उभारणार..

(वरील माहितीची आम्ही पुष्टी करत नाही. वरती दिलेला लेख हा फक्त माहितीच्या स्वरूपात घ्यावा.)

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या