Home / महाराष्ट्र / MLA Disqualification Case:आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी ! 12 नोव्हेंबरला! उबाठाला कोर्टाचा दिलासा

MLA Disqualification Case:आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी ! 12 नोव्हेंबरला! उबाठाला कोर्टाचा दिलासा

MLA Disqualification Case – सर्वोच्च न्यायालयात उबाठाला आज मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाने शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण कोणाचे यासोबतच आता शिंदे...

By: Team Navakal
supreme court

MLA Disqualification Case – सर्वोच्च न्यायालयात उबाठाला आज मोठा दिलासा मिळाला. न्यायालयाने शिवसेना पक्ष कुणाचा, धनुष्यबाण कोणाचे यासोबतच आता शिंदे गटात गेलेल्या आमदारांच्या अपात्रता (MLA Disqualification Case )प्रकरणाचीही एकत्रित सुनावणी करण्याची उबाठाची मागणी मान्य केली आहे. आता या तीनही विषयांवर 12 नोव्हेंबरला एकाचवेळी सुनावणी होणार आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर पेचावर एकाचवेळी वर्षअखेरीस निकाल येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कालच न्यायालयाने शिवसेना, धनुष्यबाण कोणाचे यावर नवी तारीख दिली होती.

उबाठाचे वकील, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती केली होती. तेव्हा न्यायालयाने अपात्रता याचिकेची सुनावणी दुसर्‍या न्यायमूर्तींसमोर असून, एकत्रित सुनावणीसाठी सरन्यायाधीशांची परवानगी घ्यावी लागेल, असे स्पष्ट केले होते. त्यावरून आज सिब्बल यांनी आमदार अपात्रता निर्णयाला आव्हान देणारी आमदार सुनील प्रभू यांच्या याचिकेवरही 12 नोव्हेंबरलाच सुनावणी घेण्याची मागणी केली. ती मागणी आज न्यायालयाने लगेचच मान्य केली. त्यामुळे आता येत्या 12 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सूर्य कांत, न्या. उज्ज्वल भुयान आणि न्या. एन. के. सिंह यांच्या पीठासमोर शिवसेना पक्ष कोणाचा, धनुष्यबाण कोणाचे आणि आमदार अपात्रता या तीनही प्रकरणाची एकत्रित सुनावणी होणार आहे.

कालच उबाठाचे अ‍ॅड. सिब्बल यांनी शिवसेना पक्ष कोणाचा, धनुष्यबाण कोणाचे यावर आपल्याला युक्तिवादासाठी केवळ 45 मिनिटांचा अवधी हवा असल्याचे स्पष्ट केले होते. शिंदे गटातर्फे 2 ते 3 दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यातच आता एकत्रित सुनावणी होणार असल्याने वेळ अधिक लागणार आहे. कालची सुनावणी ही वेळेअभावी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे सातत्याने तारीख पे तारीख सुरू असलेल्या या प्रकरणाची अंतिम सुनावणी यावेळी तरी दिलेल्या तारखेला होणार का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

माहीमचे ‘सी फूड प्लाझा १५ ऑक्टोबरपासून सुरू

 महाराष्ट्रातील न्यायालयांचा कारभारावर सुप्रीम कोर्ट चिंतेत; आरोपपत्रानंतरही दोष निश्चित नाहीत

 घायवळ प्रकरणी रोहित पवारांचे आरोप ! भाजपाकडून त्यांचेच फोटो व्हायरल

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या