राज्यभरात पावसाचा जोर कायम! शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Heavy Rains Continue Across Maharashtra

मुंबई – राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Torrential rains across Maharashtra)कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पूरस्थिती (flood)निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हवामान विभागाने रायगड, ठाणे, रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २८ जुलैपर्यंत कोकण (Konkan), गोवा (Goa), मध्य महाराष्ट्रातील घाट (Central Maharashtra)आणि मराठवाड्यात (Marathwada)जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना संभाव्य पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांवर तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

विदर्भात अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी गावात नाल्याला आलेल्या पुरात एक घर आणि ग्रामपंचायतीचे शौचालय वाहून गेले. या ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवर आली आहे.

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रिसोड तालुक्यात वाहणाऱ्या उतावली नदीला पूर आला. रिसोड तालुक्यातील पिपरी सरदमध्ये १६ एकर शेतजमिनीने नुकसान झाले. बुलडाण्यात सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने सरकारने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली. लोणार तालुक्यामधील पाच मंडळांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले.

मराठवाड्यात यंदा दमदार पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. आज परभणी, बीड, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. जालन्यातही मुसळधार पावसामुळे शेतकरी सुखावले.

मुंबई उपनगरांमध्ये कांदिवली, बोरिवली (Borivali), मालाड (Malad), अंधेरी (Andheri), दहिसर आणि गोरेगाव भागात जोरदार सरी बरसल्या. अंधेरी सबवे (Andheri subway)पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरील लोकलगाड्या उशिराने धावत होत्या. भायखळा, लालबाग, सीएसएमटी आणि चर्चगेट भागात मोठा पाऊस झाला.


High Wave Alert Along Konkan Coast – कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा !

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात मोठ्या उंचीच्या लाटांचा इशारा दिला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर भागातील समुद्रकिनाऱ्यावर उद्या रात्री साडेआठ वाजेपर्यंत ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर व रायगड जिल्ह्यांमध्ये उद्या रात्री साडेआठपर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे.