जायकवाडीचे पाणी कमी करणाऱ्या समितीवर विखे पाटलांचा दबाव ! शिंदे गटाचा आरोप

hemant patil

मुंबई – मराठवाड्यावर (Marathwada)पाण्याबाबत अन्याय होत असल्याचा आरोप करत शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील (Hemant Patli) यांनी थेट जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर (Minister Radhakrishna Vikhe Patil) विधान परिषदेत गंभीर आरोप केले. जायकवाडी धरणातून पाणी कमी सोडण्याचा (water distribution)निर्णय घेणाऱ्या प्रमोद मांदाडे समितीवर (Pramod Mandade Committee)विखे पाटील यांचा दबाव होता, असा दावा त्यांनी केला. मी मांदाडे यांना फोन केला असता त्यांनी स्वतः मंत्री विखे पाटलांचा दबाव असल्याचे सांगितले, असे पाटील यांनी स्पष्ट केले. मी नाव जाणीवपूर्वक घेत आहे, असेही ते म्हणाले.
हेमंत पाटील पुढे म्हणाले, जायकवाडीचे पाणी (jayakwadi dam.)टेलपर्यंत पोहोचत नाही. यामुळे मराठवाड्यात अपेक्षित सिंचन होत नाही. नाशिक, नगरचा पाणी रोखण्याचा दबाव कायम राहतो. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर (Marathwada’s water crisis)सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
जायकवाडी पाणीकपातीवरून राजकीय वाद पेटला आहे. मेंढेगिरी समितीच्या शिफारशीप्रमाणे धरणात ६५ टक्के पाणीसाठा झाल्यावर वरच्या धरणांतून पाणी सोडले जात असे. मात्र, मांदाडे समितीने हा निकष बदलून केवळ ५८ टक्के पाणीसाठ्यावर पाणी सोडण्याची गरज नसल्याचा निर्णय घेतला. यामुळे मराठवाड्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. नगर व नाशिकच्या फायद्यासाठी मराठवाड्याला पाणी नाकारले जात असल्याचा आरोप होत आहे