High Court – मुलांचे अपहरण करून त्यांची हत्या करणाऱ्या गावित भगिनींचा (Gavit sisters) संचित रजेचा (furlough petition) अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे सीमा गावित (Seema Gavit)आणि तिची बहीण रेणुका गावित-शिंदे यांना आजन्म तुरुंगातच राहावे लागणार आहे.
न्या. अजय गडकरी (Justices Ajay Gadkari)आणि न्या. रणजितसिंह भोसले (Ranjitsinh Bhosale)यांच्या पीठापुढे फर्लो अर्जावर सुनावणी झाली. न्यायालयाने म्हटले की, फाशीची शिक्षा जन्मपेठेत रूपांतरीत केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही सवलतीशिवाय जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल.
फर्लो जामीन म्हणजेच शिक्षा झालेल्या कैद्याला विशिष्ट कालावधीसाठी तुरुंगातून तात्पुरती सुटका मिळणे. ही एक प्रकारची रजा असून ती कैद्याच्या चांगल्या वर्तनावर आधारित असते. फर्लो हा कैद्याचा एक महत्त्वपूर्ण कायदेशीर अधिकार असून याद्वारे त्याला वर्षातून काही दिवसांसाठी तुरुंगाबाहेर राहण्याची परवानगी मिळते. याच अधिकारासाठी गावित भगिनींनी जानेवारी २०२३ मध्ये २८ दिवसांसाठी संचित रजेचा अर्ज केला होता. पोलीस अहवालात सुरक्षेचा मुद्दा व स्थायी जामीनदार नसल्याचे कारण देत रजेला विरोध करण्यात आला होता. तुरुंग महानिरीक्षकांनीही अर्ज नाकारला होता. याविरोधात या भगिनींनी वकील अंकित वगळ यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
हे देखील वाचा –
मुंबईत कबुतरखान्यांसाठी जागा शोधण्याचे काम सुरू ! १३ ठिकाणे निश्चित केली
टोलचा पैसा गडकरींच्या दोन्ही मुलांना मिळतो 128 कंपन्यांचा तपशील देईन! दमानियांचा आरोप
संजय कपूरांच्या संपत्तीचा वाद ; प्रिया कपूरचा गोपनीयतेचा आग्रह ! हायकोर्टात अर्ज