Home / आरोग्य / How To Get Sleep Early : रात्री लवकर झोप येत नाही? करून बघा हे उपाय..

How To Get Sleep Early : रात्री लवकर झोप येत नाही? करून बघा हे उपाय..

How To Get Sleep Early : अनेक जणांना रात्री झोप लवकर येत नाही म्हणून ते प्रचंड हैराण असतात, आणि आज...

By: Team Navakal
How To Get Sleep Early

How To Get Sleep Early : अनेक जणांना रात्री झोप लवकर येत नाही म्हणून ते प्रचंड हैराण असतात, आणि आज कालची पिढीचा समावेश यात जास्त प्रमाणात आहे. या समस्येमागे अनेक कारणे असू शकतात. निद्रानाशामुळे दिवसभर थकवा आळस जाणवतो. खूप चिडचिड होणं, कुठल्याही गोष्टीत एकाग्र न होणं, निरुत्साह, रोप्रतिकार शक्ती कमी होणं इत्यादी गोष्टींचा त्रास देखील यात उद्भवू शकतो.

ताणतणावात राहणाऱ्या आणि कोणत्याही गोष्टीबद्दल काळजीपूर्वक तसंच खोलवर विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये हे प्रमाण अधिक जास्त आढळून आलं आहे. यामुळे त्यांच्या स्लीपिंग सायकलमध्ये तसेच हार्मोनमध्ये बिघाड निर्माण होतो. परिणामी रात्रीच्या झोपेचे गणित पूर्णतः बिघडल्यामुळे पुढचा दिवस देखील फार काही खास जात नाही. रात्री झोप लवकर येत नाही आणि सकाळी लवकर उठणे हे शक्य होत नाही. अपुऱ्या झोपेमुळे विविध गंभीर आजार उद्भवू शकतात. अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी, चिडचिड होणे, लक्ष्य विचलित होणे असे परिणाम शरीरावर मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. या सर्वांचा आपल्या कार्यक्षमतेवर देखील दुष्परिणाम होतात. ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपल्या दिवसाचं नियोजन अखण गरजेचं आहे.

सर्वप्रथम तुम्ही आपल्या कामाचे वेळापत्रक आखणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला किती वाजता तुमचे कार्य सुरू करायचे आणि कधीपर्यंत ते पूर्ण करायचे आहे, याचे नियोजन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. या वेळापत्रकामध्ये सकाळी उठल्यानंतरची कामे ते रात्री झोपण्यापूर्वी कोणती कामे करायची आहेत, अशा प्रकारे सर्व माहिती नोंद करून ठेवा. यामुळे तुम्हाला स्वतःसाठी किती वेळ मिळेल शिवाय किती वेळानं झोपायचे आहे, याची स्पष्ट कल्पना तुम्हाला येईल. काही दिवस वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन केल्यास तुम्हाला स्वतःहूनच वेळेत झोप येईल.

शिवाय काही जण रात्री उशिरापर्यंत मोबाइलचा अतिरिक्त वापर करत असतात. ही अतिशय वाईट अशी सवय आहे. कारण या सवयीमुळे तुमच्या झोपेवर दुष्परिणाम होत असतो. काही जण उशिरापर्यंत मोबाइलवर गेम खेळत असतात किंवा एखादा सिनेमा/वेब सीरिज पाहत असतात. उशिरा रात्रीपर्यंत तुम्हाला झोप न येण्यामागील हे देखील एक प्रमुख कारण असू शकते. यामुळे झोपण्यापूर्वी शक्यतो मोबाइल दूर ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करा. रात्री उशिरापर्यंत मोबाइलवर वेळ घालवायचा असल्यास यासाठी उत्तम पर्याय म्हणजे वीकेंड. कारण यामुळे तुमच्या पुढच्या दिवसात कोणताही फरक जाणवणर नाही ,कामही प्रभावित होणार नाही आणि झोप देखील पूर्ण होईल.

अंथरुणात पडल्यानंतरही तुम्हाला झोप येत नसल्यास सुरुवातीस मन शांत करन अत्यंत गरजेचं मग दीर्घ श्वास घ्या. आपले लक्ष श्वासांवर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करा. दीर्घ पण शांत स्वरुपात श्वासोच्छवासाची प्रक्रिया हि सुरू राहू द्या. यामुळे तुमच्या मनाची एकाग्रता वाढण्यास अधिक मदत होईल. यामुळे शारीरिक तसंच मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल. यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास देखील मदत मिळेल. आपल्या मानसिक आरोग्यावर झोपेचे गणित हे मुख्यतः अवलंबून असते.


हे देखील वाचा –

Sanjay Raut :संजय राऊतांना गंभीर आजाराची लागण; दोन महिने सार्वजनिक जीवनाला ब्रेक..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या