Home / महाराष्ट्र / HSRP Number Plate : 10,000 रुपयांचा दंड टाळायचा असेल तर लक्ष द्या! वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवली नसल्यास ‘या’ तारखेपूर्वी पूर्ण करा काम

HSRP Number Plate : 10,000 रुपयांचा दंड टाळायचा असेल तर लक्ष द्या! वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवली नसल्यास ‘या’ तारखेपूर्वी पूर्ण करा काम

HSRP Number Plate Deadline : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसवणे...

By: Team Navakal
HSRP Number Plate Deadline
Social + WhatsApp CTA

HSRP Number Plate Deadline : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (HSRP) बसवणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, परिवहन विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात नोंदणीकृत असलेल्या एकूण सुमारे 2 कोटी 43 लाख जुन्या वाहनांपैकी फक्त 47 लाख 23 हजार वाहनांनाच ‘HSRP’ बसविण्यात आली आहे.

एक कोटीहून अधिक वाहनधारकांनी (सुमारे 60 टक्के) अजूनही या प्लेटसाठी पाठ फिरवल्यामुळे त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

30 नोव्हेंबर नंतर दंडाची तयारी

‘HSRP’ बसवण्यासाठी सरकारने 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत दिली आहे. ही मुदत यापूर्वी तीन वेळा वाढवण्यात आली होती, परंतु तरीही बहुतांश वाहनधारकांनी प्रतिसाद दिला नाही. आता परिवहन आयुक्तालयाने या मुदतीनंतर उर्वरित वाहनांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात मंत्रालयीन स्तरावर बैठक घेऊन लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

नियम मोडल्यास ₹10,000 पर्यंत दंड

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जर 30 नोव्हेंबरपर्यंत वाहनधारकांनी ‘HSRP’ प्लेटसाठी अर्ज केला नसेल, तर त्यांना 10 हजार रुपयांपर्यंतचा मोठा दंड भरावा लागू शकतो. तसेच, अर्ज केला असेल पण प्लेट बसवलेली नसेल, तर 1 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.

राज्यातील सद्यस्थिती आणि पुण्याची आघाडी

राज्यात ‘HSRP’ बसवण्याचे प्रमाण मुंबईसह अन्य शहरांमध्ये कमी असले तरी, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) यात पहिल्या क्रमांकावर आहे. पुण्यात सर्वाधिक वाहनांना ‘HSRP’ बसवण्यात आली आहे, तर मुंबईतील अंधेरी आरटीओतही चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

HSRP प्लेटसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सोपी पद्धत

  • transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जा.
  • ‘Apply High Security Registration Plate Online’ या पर्यायावर क्लिक करा.
  • ‘ऑर्डर HSRP’ वर क्लिक करून वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर भरा.
  • शुल्क भरून पेमेंट (Payment) करा.
  • मिळालेल्या रिसिप्टच्या आधारे जवळच्या एजन्सीत अपॉइंटमेंट (Appointment) बुक (Book) करून प्लेट बसवून घ्या.

हे देखील वाचा –  MG Windsor EV : ‘या’ इलेक्ट्रिक कारने सर्वांनाच लावले वेड, 50 हजार लोकांनी खरेदी केली गाडी; किंमत-वैशिष्ट्ये जाणून घ्या

Web Title:
संबंधित बातम्या