Human -leopard Conflict : पुणे जिल्ह्यातील जुन्नर (Junnar),आंबेगाव, खेड आणि शिरूर या तालुक्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाढत्या मानव-बिबट संघर्षाने गंभीर रूप धारण केले आहे.बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे (Leopard population)आणि मानवी वस्त्यांमधील त्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बिबट्यांना जेरबंद करून मानव-बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ११ कोटी २५ लाख रुपयांचा निधी (11.25 crore)मंजूर केला आहे.यामध्ये मनुष्यहानी रोखण्यास प्राधान्य दिले जाणार असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केले आहे.
या निधीसाठी आंबेगावचे आमदार तथा माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील (Former minister Dilip Walse-Patil)यांनी सातत्याने पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने निधी मंजूर केला. यापूर्वीही जिल्हा नियोजन मंडळामार्फत (District Planning Committee) २ कोटींचा निधी पिंजरे खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.त्यानुसार संबंधित आदेश जारी करण्यात आले आहेत.
या मंजूर निधीतून जुन्नर वन विभागाच्या (Junnar Forest Division)कार्यक्षेत्रात २० विशेष रेस्क्यू टीम स्थापन केल्या जाणार आहेत.प्रत्येक टीममध्ये प्रशिक्षित नेमबाज, शोधक, ट्रॅक्युलायझिंग गन, रेस्क्यू वाहने, अत्याधुनिक कॅमेरे आणि पिंजरे यांसह आवश्यक साधनसामग्रीचा समावेश असेल.या मोहिमेत ५०० पिंजरे, २० ट्रॅक्युलायझिंग गन, ५०० ट्रॅप कॅमेरे (500 trap cameras), २५० लाईव्ह कॅमेरे, ५०० हा पॉवर टॉर्च (torches),५०० स्मार्ट स्टिक(500 smart sticks),२० वैद्यकीय किट्स अशा अत्याधुनिक उपकरणांचा वापर होणार आहे.प्रत्येक टीममध्ये ५ ते ६ प्रशिक्षित सदस्य असतील.
हे देखील वाचा –
नगर परिषद, पंचायत निवडणुका 2 डिसेंबरला सर्व मागण्या धुडकावल्या! विरोधक संतापले
महादेव बेटिंग अॅप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी दुबईहून बेपत्ता
देशातील सर्वाधिक श्रीमंतांची संपत्ती ६२ टक्क्यांनी वाढली !गरीब- श्रीमंतांमधील दरी वाढत चालली









