Home / महाराष्ट्र / Inc objects unopposed election : जामनेर नगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीवर काँग्रेसचा न्यायालयात आक्षेप

Inc objects unopposed election : जामनेर नगराध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडीवर काँग्रेसचा न्यायालयात आक्षेप

Inc objects unopposed election : जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीवर काँग्रेसने आक्षेप नोंदवला. काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना...

By: Team Navakal
Congress objects unopposed election
Social + WhatsApp CTA

Inc objects unopposed election : जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाच्या बिनविरोध निवडीवर काँग्रेसने आक्षेप नोंदवला. काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांनी या निवड प्रक्रियेला आव्हान देत न्यायालयात धाव घेतली. बिनविरोध निवड झालेल्या साधना गिरीश महाजन (Sadhana Mahajan) या राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या पत्नी आहेत.

काँग्रेसच्या उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांनी आरोप केला की, नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान सूचकांच्या नियमांमध्ये ऐनवेळी बदल करून अर्ज नामंजूर झाला. १७ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख असताना त्या दिवशी केवळ एकच सूचक आवश्यक असल्याचा नियम लागू होता. विसपुते यांनी त्या अनुषंगाने अर्ज दाखल केला.मात्र निवडणूक आयोगाने १८ नोव्हेंबर रोजी नवीन पत्रक जारी करून १७ नोव्हेंबरचे पत्र रद्द केले व राजकीय पक्षांकडून उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांसाठी पाच सूचकांची सक्ती केली. हे बदल छाननीच्या दिवशीच जाहीर झाल्याने उमेदवारांना कोणताही पर्याय न ठेवता त्यांचे अर्ज बाद झाले. डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला तरी माघारीची संधी मिळण्यापूर्वीच सूचकांच्या विषयावरून अर्ज बाद झाले. ए-बी फॉर्मधारक उमेदवाराला दबाव टाकून माघार घेण्यास भाग पाडल्यामुळे साधना महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व मागील विधानसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या विरोधात लढलेले दिलीप खोडपे यांनी सांगितले की, निवडणुकीत मविआ उमेदवारांना सत्ताधाऱ्यांकडून धमकावले.काहींवर नजर ठेवली तर काहींना जबरदस्ती घरातून उचलून नेत त्यांचा पक्षात प्रवेश करून घेतला.


हे देखील वाचा –

 सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण होणार?

हिंदूंनी २ मुले जन्माला घातली तरच धर्म टिकेल ! नरेंद्र महाराजांचे आवाहन

Web Title:
संबंधित बातम्या