Home / महाराष्ट्र / election voting : शाई पुसली, मशीन बंद, पैसे वाटप, बोगस मतदान, दुबार मतदान ! पालिका मतदानावेळी प्रचंड गोंधळ! निवडणूक आयोग सुस्त

election voting : शाई पुसली, मशीन बंद, पैसे वाटप, बोगस मतदान, दुबार मतदान ! पालिका मतदानावेळी प्रचंड गोंधळ! निवडणूक आयोग सुस्त

election voting- आज राज्यातील 29 महापालिकांसाठी सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झाले आणि गोंधळच सुरू झाला. ज्या मतदारांच्या बोटावर मार्कर...

By: Team Navakal
election
Social + WhatsApp CTA

election voting- आज राज्यातील 29 महापालिकांसाठी सकाळी 7.30 वाजता मतदान सुरू झाले आणि गोंधळच सुरू झाला. ज्या मतदारांच्या बोटावर मार्कर पेनाने शाई लावली त्यापैकी अनेकांची शाई पुसली जात होती. सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर असंख्य मतदान केंद्रांमधील ईव्हीएम मशीन बंद पडली ज्यामुळे मतदार अनेक तास ताटकळले किंवा निघून गेले. केंद्रांबाहेर विरोधी राजकीय गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडत होते, यावेळी बुथची संख्या वाढल्याने मतदारांना यादीत त्यांचे नाव सापडेना आणि कुणी अधिकारी त्यांना मदत करीत नसल्याने संताप पसरत होता.  काही ठिकाणी मतदानाच्या दिवशी आज पैसे वाटप सुरू होते. बोगस मतदार पकडले गेले. एके ठिकाणी तर कैदेत असलेल्या एकाने मतदान केले आणि सही सुद्धा केली असे आढळले. या अभूतपूर्व गोंधळावेळी आयोग शांत राहिले. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपा नेत्यांनी म्हटले की, काहीही झालेले नाही. ठाकरे बंधूंना पराजय दिसत असल्याने या तक्रारी केल्या जात आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकारांचा निषेध केला. आता उद्या मतमोजणीच्या दिवशीही तणावाचे वातावरण अपेक्षित आहे.

ईव्हीएम बंद! मतदारांची रखडपट्टी
आज मतदानाच्या दिवशी सकाळी अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड असल्याने मतदारांना तासन्‌‍तास रांगेत उभे राहावे लागले. या रखडपट्टीमुळे अनेक ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणात मतदान न करताच निघून गेले. मुंबईत दादरच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने बटण दाबले जात नाही, अशा तक्रारी मतदारांनी केल्या. या तांत्रिक घोळामुळे मतदारांना बराच वेळ रांगेत ताटकळत उभे राहावे लागले.पुण्यात प्रभाग क्रमांक 24, 25, 26 आणि 33 मध्ये ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने सुमारे दोन-तीन तास वाया गेल्याने मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. अमरावती प्रभाग क्रमांक 2 मध्ये यंत्रावरील एक बटण दाबले जात नव्हते. त्यामुळे केंद्रांवर गोंधळ उडाला. छत्रपती संभाजीनगरमधील प्रभाग क्रमांक 15 मध्ये गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्र क्र. 22 वर ईव्हीएम यंत्र बंद पडल्याने एक तास मतदान प्रक्रिया थांबवावी लागली. चंद्रपूर जिल्ह्यात प्रभाग क्रमांक 12 मधील मतदान केंद्र क्रमांक 10 मध्ये ईव्हीएम बंद असल्याने सकाळी लवकर उत्साहाने मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचा हिरमोड झाला. अर्धा-पाऊण तास या ठिकाणी मतदान प्रक्रिया ठप्प झाली होती.


वसई-विरारमध्ये काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम बंद असल्याचे निदर्शनास आले. प्रभाग क्रमांक 26, उमेळमान येथील जिल्हा परिषद शाळा, खोली क्रमांक 3, मतदान केंद्र क्रमांक 28 मध्ये ईव्हीएम तब्बल तीन तास बंद होती. त्यामुळे उमेदवार आणि मतदार संतापले. या तांत्रिक गफलतीवर तीव्र संताप व्यक्त करत मतदान सुरळीत करता यावे यासाठी आयोगाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी काही मतदारांनी केली.


विरारमध्ये प्रभाग क्रमांक 3 मधील जिवदानी विद्यावर्धिनी शाळेतील मतदान केंद्रातील ईव्हीएम पावणे दोन तास बंद होते. या रखडपट्टीला कंटाळून अनेक मतदार घरी निघून गेले. काही तरुणांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने व्हिडिओ चित्रण केले होते. मात्र पोलिसांनी ते व्हिडिओ डिलिट करायला लावले.कल्याण पूर्व नेतेवली परिसरातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदानादरम्यान अडथळा. महानगरपालिकेच्या प्रबोधन बाळासाहेब ठाकरे शाळेतील ईव्हीएम मशीन अचानक बंद पडली. मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये काही काळ संभ्रम व गोंधळ निर्माण झाला. सुमारे अर्ध्या तासाच्या खोळंब्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी ईव्हीएमची दुरुस्ती केली. त्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान ईव्हीएममध्ये दोष असल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवार पार्वती जोगी यांनी केला. धनुष्यबाणासमोरील बटण दाबल्यावर कमळ चिन्हासमोरील लाईट पेटते,अशी तक्रार जोगी यांनी केली. मतदान यंत्रांमध्ये जाणीवपूर्वक बिघाड करण्यात आला आहे.सर्व यंत्रणा मॅनेज झाल्यासारखी परिस्थिती आहे.लोकशाही वेठस धरली जात आहे,असे जोगी यांनी माध्यमांशी
बोलताना सांगितले.

पैशांचा खेळ! रोख रक्कम जप्त
मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. नाशिकसह इचलकरंजी, उल्हासनगर, परभणी आणि नवी मुंबई व इतरत्र पैसे वाटपाच्या आरोपांमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.नाशिक महापालिका निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपाचे माजी नगरसेवक दिनकर आढाव यांच्या ताब्यातील फॉर्च्युनर वाहनातून दोन लाखांची रोख रक्कम जप्त केली.नाशिक सिडकोतील प्रभाग क्रमांक 25 आणि 29 मध्ये पैसे वाटप होत असल्याच्या चर्चेमुळे दुपारच्या सुमारास तणावाचे वातावरण निर्माण झाले. भाजपा उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयामागील उद्यानात पैसे वाटप होत असल्याची चर्चा पसरल्यानंतर मोठी गर्दी जमली. याठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार ॲड. अतुल सानप आणि अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे कार्यकर्त्यांसह पोहोचल्याने दोन्ही गट आमनेसामने आले. कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमाव पांगवला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कार्यालय आणि उद्यान तात्पुरते बंद करण्यात आले.


नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपा उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला झाला. पैसे वाटपाच्या आरोपावरून शिंदे गट आणि भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. मतदान सुरू असतानाच इचलकरंजीमध्ये सुरू असतानाच इचलकरंजीमध्ये वातावरण तापले. भाजपा कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप उबाठा गटाने केला. या आरोपांनंतर मतदान केंद्राबाहेर दोन्ही गट आमनेसामने आले आणि जोरदार खडाजंगी झाली.
उल्हासनगरमध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपाने केला. याप्रकरणी एका संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परभणीत मतदार केंद्राबाहेर भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप अजित पवार गटाने केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.नवी मुंबईच्या खारघर सेक्टर 20 मध्ये पैशांनी भरलेली बॅग आढळून आली. त्यातून 2 लाख 13 हजार रुपये जप्त करण्यात आले.या प्रकरणी एका संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही रक्कम कोणत्या पक्षाची आहे आणि कोणत्या उद्देशाने आणण्यात आली होती, याचा तपास पोलीसकरत आहेत.

मतदान केंद्रांबाहेर मारहाण आणि कल्लोळ
विविध मतदान केंद्रांबाहेर तणावपूर्ण परिस्थिती होती. मुंबई, ठाणे, जळगाव, भिवंडी आणि नाशिकमध्ये पक्षीय वाद, हाणामारी आणि गोंधळामुळे अनेक मतदान केंद्रांबाहेर कल्लोळाचे वातावरण  निर्माण झाले होते. भांडुप, कुर्ला पूर्व आणि जळगाव, नाशिकमधील काही ठिकाणी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या घटनांनी निवडणूक प्रक्रिया तणावपूर्ण झाली होती.मुंबईच्या भांडुप येथील गावंड कंपाऊंड आणि आदर्श नगर प्रभाग क्रमांक 114 मधील मतदान केंद्राबाहेर उबाठा आणि शिंदे गटाच्या दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. आमदारांकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून दोन्ही गटांतील कार्यकर्ते आमनेसामने आले. कुर्ला पूर्व येथील कामगार नगरमधील पंत वालावलकर शाळेतील मतदान केंद्रावर मतदारांची केंद्र व बूथमध्ये बदल झाल्याने मोठा गोंधळ उडाला. नावे शोधण्यासाठी निवडणूक कर्मचारी सहकार्य करत नसल्याचा आरोप संतप्त मतदारांनी केला. जळगाव महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 मध्ये मतदान केंद्रावर उमेदवार आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. अन्य पक्षाचे उमेदवार मतदान केंद्राबाहेर प्रचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार शीतल (हेतल) पाटील यांनी केला आणि पोलिसांना जाब विचारला. यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्येही तणावाचे वातावरण होते. भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या समर्थकांनी कोणार्क विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाले. या घटनेनंतर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली. याशिवाय भिवंडीतच प्रभाग 19 मध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. संभाजीनगरमध्ये भाजपाचे विशिष्ट कोडींग टी-शर्ट वरून वाद निर्माण झाल्याने गोंधळ झाला होता. अमरावतीत प्रभाग 8 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येराडा झाला.

दुबार मतदारांचा मुद्दा तापला
राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीआधी दुबार मतदारांच्या मुद्यावर ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दुबार मतदार आढळल्यास त्याला तिथेच फोडून टाका, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. आज दादरमधील प्रभाग क्रमांक 192 मध्ये एका महिला मतदाराचे नाव दुबार मतदार म्हणून असल्याचे मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांना आढळले. मग या महिला मतदाराकडून इथेच मतदान करणार असल्याचा फॉर्म लिहून घेऊन त्यांना मतदान करू दिले.
चेंबूर येथील प्रभाग क्रमांक 146 मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथील मतदान केंद्रावरही दुबार मतदार आढळून आला. निवडणूक कर्मचाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करत नियमांनुसार पुढील प्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचे आणि कोणताही त्रास देण्यात आला नसल्याचे संबंधित मतदाराने सांगितले.

मतदानाच्या दिवशी टपाल मते मोजता?
उद्धव ठाकरेंचा आयोगाला सवाल

राज ठाकरे यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे आज दुपारी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, आम्ही आयोगाला दुबार मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिले. त्यानंतर आता बोटांवरील शाई पुसली जात आहे. हा प्रकार बोटांवरील शाई पुसण्याचा नव्हे तर लोकशाही पुसण्याचा आहे. आता मतदान केले का? हा प्रश्न विचारण्याऐवजी शाई पुसली का? असा प्रश्न विचारला पाहिजे. देवेंद्र फडणवीस व त्यांची चोर कंपनी हरली आहे. हरलेल्या मानसिकतेतूनच त्यांना जिंकण्यासाठी असे गैरप्रकार करावे लागत आहेत.
साधारणतः मतदानाचा व मतमोजणीचा दिवस वेगवेगळा असतो. फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात होत होती. त्यानंतर मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत निकाल लागायचे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत असा दंडक आहे. त्यात पोस्टल मतदानही आले. पण आता प्रभाग क्रमांक 200 ते 206 च्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज दुपारी मतदानाच्या दिवशीच दुपारी 3 वाजता टपाली मतदानाच्या पेट्या उघडायचे निर्देश दिले आहेत. तसे पत्र त्यांनी दिले आहे. मतदानाच्या दिवशीच टपाली मतदानाच्या पेट्या उघडल्या जात आहे. ही कसली लोकशाही आहे?


निवडणूक आयोग व निवडणूक आयुक्त कशाचा पगार घेत आहेत? महापालिका निवडणूक 9 वर्षांनी होत आहेत. गतवर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. पण मतदारयाद्यांत कुठेही सुधारणा झाली नाही. निवडणूक आयुक्त कशाचा पैसा खात आहेत? संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. निवडणूक आयोग संविधान विरोधी आहे. मुख्यमंत्री आपल्या घरगड्याला निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करत आहेत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाही. हा सर्व प्रकार धाकदडपशाहीचा आहे. या सगळ्या गोष्टींवर इलाज करायचा असेल तर निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. कारण हे बसल्या जागी फुकट जनतेचा पैसा खात आहेत. सत्ताधाऱ्यांची लाचारी करत आहेत. त्यामुळे आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांचा संपूर्ण स्टाफ दिवसभर काय करतो याचा छडा आता लावावा लागेल, असे ठाकरे म्हणाले.

आम्ही सत्ताधाऱ्यांच्या खोटेपणाचे कुभांड फोडत आहोत. अन्यथा आम्ही एवढ्या ताठ मानेने त्यांच्यापुढे उभे राहिलोच नसतो. त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न लोकांपुढे उघडा पाडत आहोत. दुबार मतदान असेल, धाक दडपशाही असेल, पैसे वाटताना त्यांनीच एकमेकांची लोकं पकडली आहेत. कल्याण – डोंबिवलीमध्ये मतदान केंद्राबाहेर भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या ठेवून मतदान केंद्राबाहेर केंद्र चालवले जात आहे. यावर आयोगाला काय म्हणायचे आहे?  रवींद्र नामक व्यक्तीच्या नावापुढे बाईचा फोटो आहे. वनमंत्र्यांनाही आपले मतदान केंद्र 4 तास सापडले नाही. मंत्री गणेश नाईक यांचे मतदान केंद्र फरार झाले आहे. ही सध्याची स्थिती आहे.  ठाण्यात कुणाचे मतदान कुठे आहे हे कळायलाच मार्ग नाही. मोदींना सत्ता मिळवण्यासाठी वन नेशन वन इलेक्शन हवे आहे. वाट्टेल ते करा, पण सत्ता काबिज करा असे उद्धव ठाकरे म्हणाले.

2012 पासून मार्कर वापरतो पण जिल्हा परिषदेत शाई वापरू
निवडणूक आयुक्तांचा खुलासा

ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगावर तीव्र टीका केल्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. दिनेश वाघमारे म्हणाले की, आम्ही नियमानुसार काम करत आहोत. सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 2012 पासून सुरू केला आहे. मार्कर कोरस कंपनी कडून घेतला जातो. याच कंपनीची शाई केंद्रीय निवडणूक आयोग काडीने लावते. पण तीच शाई पेनच्या माध्यमातून वापरत आहोत. मार्करची शाई 10-12 सेकंदात सुकते. त्यानंतर ती शाई पुसली जात नाही. जर कोणी ते पुसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. शाई पुसण्याचे व्हिडिओ आहेत त्यांची चौकशी केली जाणार आहे. जर ते खोटे असतील तर व्हिडिओ तयार करण्याऱ्यावर तसेच जे समाज माध्यमांवर असे संभ्रम निर्माण करत आहेत त्याच्यावर कारवाईचे आदेश देखील देण्यात आले आहेत. जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मार्करच्या जागी शाई वापरली जाणार आहे.

याला विजय म्हणत नाहीत
राज ठाकरे यांचा घणाघात      
                               
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज कुटुंबासह मतदानाचा हक्क दादरच्या बालमोहन शाळेत बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि प्रशासनावर अत्यंत गंभीर आरोप केले. राज ठाकरे म्हणाले की, मतदान करा, बाहेर या, शाई पुसा व पुन्हा आत जाऊन मतदान करा, हा विकास आहे का? निवडणूक पारदर्शकपणे पार पडणे आवश्यक आहे. पण येनकेन प्रकारे निवडणूक जिंकण्यासाठी, सत्तेसाठी संपूर्ण प्रशासनच कामाला लावल्याचे दिसत आहे. हे काही चांगल्या लोकशाहीचे लक्षण नाही. अशाप्रकारे सत्तेत येण्याला विजय म्हणत नाहीत.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज मतदानासाठी आलो तर नवीनच गोष्ट पाहिली. आजपर्यंत बोटाला शाई लावली जात असे. आज बोटाला मार्करने खूण केली जात आहे. ही शाई सॅनिटायझर लावले की लगेच निघून जाते. म्हणजे शाई लावा, पुसा आणि पुन्हा मतदान करा असे करायचे आहे. यामुळे दुबार मतदानाची शक्यता आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना असे प्रकार समोर आणण्यास सांगितले आहे. दुबार मतदारांनंतर व्हीव्हीपॅटचा विषय आला. व्हीव्हीपॅट नसल्यामुळे आपण ज्या उमेदवाराला मतदान केले आहे, ते त्यालाच झाले आहे का हे कळत नाही. आता मतमोजणीच्या वेळी नवीन पाडू मशीन आणले गेले आहे. ते राजकीय पक्षांनादेखील दाखवले नाही. पत्र पाठवल्यानंतरही निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलेले नाही. या निवडणुकीत अजब नियम लागू केला. मतदानाच्या आदल्या दिवशीही प्रचार करण्याची मुभा दिली गेली. विरोधकांनी, दुसऱ्या पक्षांनी निवडणुका लढायच्या की नाही? निवडणुका का कशा जिंकायच्या हे सरकारने ठरवायचे. विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी जे केले तसेच करायचा प्रयत्न आहे. मात्र तसे होणार नाही. निवडणुका जिंकण्यासाठी सरकार वाट्टेल ते करत आहे. संपूर्ण प्रशासन हे कामाला लागले आहे. आम्ही आमच्या परीने जे करायचे ते करत आहोत. अशा निवडणुका लोकशाहीची लक्षणे नाहीत. अशा निवडणुका लढून सत्तेवर येणे याला सत्ता म्हणत नाही. सत्तेचा किती गैरवापर करावा, यालाही काही मर्यादा असायला हव्यात.

तुरुंगातील व्यक्तीचे मतदान
बोगस मतदानाचा सुळसुळाट

आज बोगस मतदानाच्या घटनांचा सुळसुळाट झाल्याने गोंधळ निर्माण केला. मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक, सोलापूर, जालना आणि भिवंडीतील काही प्रभागांमध्ये मतदारांच्या नावांचा गैरवापर आणि संशयास्पद मतदान समोर आले. ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुण्यात प्रभाग 25 मध्ये तुरुंगातील आरोपी अतुल बेहरेकडून मतदान झाल्याचा प्रकार उघड झाला. तर प्रभाग क्रमांक 41 चे शिंदे गटाचे उमेदवार नाना भानगिरे यांनी ग्रामीण भागातून मतदार आणल्याचा गंभीर आरोप केला. तर पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 शिंदे गटाचे उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांनी आरोप केला की, महादेव वाडी उंड्री परिसरात बीड, नांदेड या ग्रामीण भागातून लोकांना मतदानासाठी खासगी गाडीतून आणण्यात आले. जवळपास 700-800 मतदार पकडले आहेत. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित इमारतीत कोंडून ठेवले होते. त्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली.
विरारमध्ये ताराबाई वर्तक शाळेत प्रभाग क्रमांक 3 च्या मतदान केंद्रात महेश राठोड मतदाराच्या नावावर दुसऱ्यानेच आधी मतदान केल्याचा प्रकार उघड झाला, तर ठाण्यातही दुर्गादास शेट्टी मतदानाला गेल्यावर त्याठिकाणी अगोदरच त्यांच्या नावे मतदान झाल्याचे समजले. याशिवाय कल्याणमध्ये ज्येष्ठ नागरिक सुमन भालचंद्र गायकवाड यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. जालन्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जिन परिसरात बोगस मतदानाच्या संशयावरून मतदार मधुकर देठे याला ताब्यात घेतले, सोलापुरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षात वाद झाला. समाजवादी पक्षाच्या आरोपानुसार, कर्नाटकमधून सुमारे दोन हजार बोगस मतदारांच्या  गाड्या भरून आणल्या. मात्र, समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज खरादी यांनी पकडलेले  बोगस मतदार माफी मागून परतल्याचे सांगितले. नवी मुंबईतील कुकशेत येथे बोगस मतदारावरून गोंधळ झाला. संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी प्रभाग 24 मध्ये बोगस मतदाराला पकडले. सिटी चौक पोलिसांनी बुरखा घातलेल्या बोगस महिला मतदारांना पकडले.अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 3 आनंद विद्यालय या मतदान केंद्रावर 300 ते 400 बोगस मतदान कार्ड तयार करून ते काही तरुणांच्या हातात दिले जात असून, त्याद्वारे हे मतदान घडवून आणले जात असल्याचा आरोप शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत उर्फ काका शेळके, संगीता खरमाळे, चेतन क्षीरसागर, वाखुरे, अपक्ष उमेदवार जयंत येलुलकर यांनी केला.

तुरुंगातील व्यक्तीचे मतदान
बोगस मतदानाचा सुळसुळाट

आज बोगस मतदानाच्या घटनांचा सुळसुळाट झाल्याने गोंधळ निर्माण केला. मुंबई, पुणे, जळगाव, नाशिक, सोलापूर, जालना आणि भिवंडीतील काही प्रभागांमध्ये मतदारांच्या नावांचा गैरवापर आणि संशयास्पद मतदान समोर आले. ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुण्यात प्रभाग 25 मध्ये तुरुंगातील आरोपी अतुल बेहरेकडून मतदान झाल्याचा प्रकार उघड झाला. तर प्रभाग क्रमांक 41 चे शिंदे गटाचे उमेदवार नाना भानगिरे यांनी ग्रामीण भागातून मतदार आणल्याचा गंभीर आरोप केला. तर पुण्यातील प्रभाग क्रमांक 41 शिंदे गटाचे उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांनी आरोप केला की, महादेव वाडी उंड्री परिसरात बीड, नांदेड या ग्रामीण भागातून लोकांना मतदानासाठी खासगी गाडीतून आणण्यात आले. जवळपास 700-800 मतदार पकडले आहेत. त्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित इमारतीत कोंडून ठेवले होते. त्यामुळे संबंधितांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली.
विरारमध्ये ताराबाई वर्तक शाळेत प्रभाग क्रमांक 3 च्या मतदान केंद्रात महेश राठोड मतदाराच्या नावावर दुसऱ्यानेच आधी मतदान केल्याचा प्रकार उघड झाला, तर ठाण्यातही दुर्गादास शेट्टी मतदानाला गेल्यावर त्याठिकाणी अगोदरच त्यांच्या नावे मतदान झाल्याचे समजले. याशिवाय कल्याणमध्ये ज्येष्ठ नागरिक सुमन भालचंद्र गायकवाड यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. जालन्यातील प्रभाग क्रमांक 9 मधील डबल जिन परिसरात बोगस मतदानाच्या संशयावरून मतदार मधुकर देठे याला ताब्यात घेतले, सोलापुरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये एमआयएम आणि समाजवादी पक्षात वाद झाला. समाजवादी पक्षाच्या आरोपानुसार, कर्नाटकमधून सुमारे दोन हजार बोगस मतदारांच्या  गाड्या भरून आणल्या. मात्र, समाजवादी पक्षाचे उमेदवार रियाज खरादी यांनी पकडलेले  बोगस मतदार माफी मागून परतल्याचे सांगितले. नवी मुंबईतील कुकशेत येथे बोगस मतदारावरून गोंधळ झाला. संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी प्रभाग 24 मध्ये बोगस मतदाराला पकडले. सिटी चौक पोलिसांनी बुरखा घातलेल्या बोगस महिला मतदारांना पकडले.अहिल्यानगरच्या प्रभाग क्रमांक 3 आनंद विद्यालय या मतदान केंद्रावर 300 ते 400 बोगस मतदान कार्ड तयार करून ते काही तरुणांच्या हातात दिले जात असून, त्याद्वारे हे मतदान घडवून आणले जात असल्याचा आरोप शिंदे सेनेचे उमेदवार चंद्रकांत उर्फ काका शेळके, संगीता खरमाळे, चेतन क्षीरसागर, वाखुरे, अपक्ष उमेदवार जयंत येलुलकर यांनी केला.

आशिष शेलारांचा मतदारांवरच राग
भाजपा नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, ज्या व्यक्तीने शाई पुसण्याचा प्रयत्न केला, त्याच्या मनात शाई पुसावी असा विचार का आला? म्हणजे त्यांचा गुन्हेगारी करण्याचा हेतू होता. निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे. ज्यांनी शाई पुसली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. ठाकरे बंधूंना प्रश्न आहे की, तुमच्या बोटाची शाई पुसली गेली का? मग दुसऱ्याची कशी काय पुसणार? असे कोणते तेल आहे? ठाकरे बंधू राजकीय नटसम्राट आहेत. निवडणूक आयोगाने या सगळ्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. निवडणुकीच्या दिवशीच उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत. राजकीय हेतू त्यांना साध्य करायचे आहे का? आचारसंहितेचा भंग आहे का? हे पाहावे लागेल. मतदार दुपारी 3 वाजेपर्यंत 30 टक्के मतदान झाले. विश्वास ठेवून मतदान होत असताना ही आडकाठी का? गतिरोधक आहे का? निवडणूक आयोगाने लक्ष ठेवले पाहिजे का निवडणूक यंत्रणांना तक्रार केलेली समोर आलेली नाही. लेखी तक्रार, ईमेल केलं आहे असे पण काही नाही. थेट पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे  आम्हाला उत्तर द्यावे लागत आहे. कारण ते बोलले आहेत. देवेंद्रजींचे ते नाव घेत आहेत. उद्धव ठाकरे बोलले ते सर्वस्व असत्य आहे. ते आधी मतदारयादीमध्ये चोरी झाली बोलले, मग कंपन्या आणि एजन्सींवर बोलले. मग दुबार मतदारांची चोरी बोलले, मतदान केंद्र निवड प्रक्रियेत चोरी आहे सांगितले. तेवढ्यावर थांबले नाही मग नियमांमध्ये चोरी आहे सांगितले. पाडूमध्ये चोरी सांगितली आणि आता शाईत चोरी केली जात आहे असं बोलत आहेत. राजकीय मेंदूत यांचा केमिकल लोचा झाला आहे. आता 5.30 पर्यंत आकडे अधिक असतील तर तेव्हा पण करतील. त्यातही बोलतील चोरी केली. ठाकरे बंधूंचे सल्लागार सडके, आणि ठाकरे रडके, असा टोला त्यांनी लगावला.

गगराणींची आधी कबुली
नंतर  तोंडावर बोट

मुंबई महापालिका निवडणुकीत मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याचे आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सुरुवातीला असा प्रकार होत असल्याचे  मान्य केले. मात्र, या प्रकरणी विरोधकांनी कारवाई करण्याची मागणी लावून धरल्यानंतर गगराणी यांनी घूमजाव केले. मुंबई  महापालिका प्रशासनाकडून असे स्पष्टीकरण केले की, मतदानानंतर बोटावरील शाई पुसली जात असल्याबाबत  महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे माध्यमांत प्रसारित होणाऱ्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.

————————————————————————————————————————

हे देखील वाचा – 

आयसीसीशी चर्चा मात्र भारतात सामने न खेळण्यावर बांगलादेश ठाम

ऑस्करच्या ‘बेस्ट पिक्चर’ श्रेणीसाठी भारतीय चित्रपटांची एन्ट्री; हॉलिवूडच्या दिग्गजांशी होणार सामना

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या