शक्तिपीठ महामार्गाविरोधात १५ ऑगस्टला अभिनव आंदोलन

protest against Shaktipeeth Highway on August 15

कोल्हापूर – शक्तीपीठ महामार्गाविरोधात (Shaktipeeth Highway)शुक्रवार, १५ ऑगस्टला अभिनव आंदोलन (protest) करण्यात येणार आहे. ज्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे, त्या शेतात तिरंगा झेंडा (national flag)लावून शक्तिपीठ महामार्ग आम्हाला नकोच, असा संदेश दिला जाणार आहे. हे आंदोलन तब्बल १२ जिल्ह्यांमध्ये केले जाणार आहे.

शक्तिपीठ महामार्ग विरोधात काल शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीची (Shaktipeeth Highway Opposition Action Committee) बैठक पार पडली. शक्तिपीठ विरोधातील बारा जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर शेतकरी या बैठकीसाठी ऑनलाइन सहभागी झाले. शक्तिपीठ नको, आमच्या वावरात (farm lands)या घोषवाक्यासह स्वातंत्र्यदिनी (on Independence Day.)शेतातच मेळावे घेण्याचाही निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

आमदार सतेज पाटील (MLA Satej Patil)म्हणाले की, सरकार (government)हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत असले तरी आम्ही तो होऊ देणार नाही. त्याऐवजी राज्यात ज्या ठिकाणी रस्ते नाहीत, तिथे रस्ते बांधा, शेतकऱ्यांना (farmers)कर्जमाफी द्या. ८६ हजार कोटींचा शक्तिपीठ महामार्ग आता १ लाख ६ हजार कोटींवर पोहोचला आहे. स्वातंत्र्यदिनी शेतात तिरंगा लावून सरकारला ठणकावून सांगू की, हा महामार्ग आम्हाला नको.