Home / आरोग्य / Intermittent fasting : तुम्ही हि ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ करत आहात का? तस असेल तर हे नक्की वाचा..

Intermittent fasting : तुम्ही हि ‘इंटरमिटेंट फास्टिंग’ करत आहात का? तस असेल तर हे नक्की वाचा..

Intermittent fasting : आजकाल लोक फिटनेसला बरच महत्व देताना दिसत आहेत. लोकांमध्ये आरोग्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण होत आहे आणि यामुळे...

By: Team Navakal
Intermittent fasting 

Intermittent fasting : आजकाल लोक फिटनेसला बरच महत्व देताना दिसत आहेत. लोकांमध्ये आरोग्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण होत आहे आणि यामुळे इंटरमिटेंट फास्टिंग हे अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. ह्या डाइटचा उपयोग फक्त वजन कमी करण्यासाठीच नाही तर शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास, पचन सुधारण्यास आणि ऊर्जा वाढवण्यास देखील मोठ्या प्रमाणावर मदत करते.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय?

सोप्प्या शब्दात सांगायचं झाल तर दिवस भर उपवास इंटरमिटेंट फास्टिंग ही एक आहार पद्धती आहे. ज्यामध्ये काही तासांसाठी अन्नाचे सेवन केले जात नाही आणि उर्वरित वेळेत फक्त निरोगी अन्न खाल्ले जाते. यामध्ये प्रामुख्याने खाण्याच्या वेळा निश्चित केल्या जातात. या फास्टनिंगमध्ये विविध प्रकारचे पॅटर्न प्रचंड प्रसिद्ध आहेत. सगळ्यात आधी १६/८ हि पद्धत यामध्ये १६ तास उपवास केला जातो आणि ८ तासांच्या आत अन्नाचे सेवन केले जाते.

दुसरा पर्याय ५:०२ अश्या प्रकारात केले जाते. यात आहार आठवड्यातून ५ दिवस सामान्य आहार घेतला जातो आणि २ दिवस कमी कॅलरीज (५००-६०० कॅलरीज) घेतल्या जातात. आणि तिसऱ्या प्रकारात ईट स्टॉप ईट यामध्ये, आठवड्यातून एक किंवा दोनदा पूर्ण २४ तासाचा उपवास केला जातो. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे वॉरियर डाएट यामध्ये २० तास उपवास आणि नंतर ४ तास खाणे समाविष्ट आहे. २० तासांच्या उपवासात, तुम्हाला फक्त कमी कॅलरी असलेले पदार्थ जसे की फळे, भाज्या आणि गोड नसलेले पेये खावे लागते. तर, उरलेल्या ४ तासांत तुम्ही सामान्य अन्न खाऊ शकता.

इंटरमिटेंट फास्टिंगमुळे वजन कमी करण्यास मदत होते. इंटरमिटेंट फास्टिंगमुळे शरीर जास्त कॅलरीज बर्न करत असते. हे साठवलेल्या चरबीचे उर्जेमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया वेगवान स्वरूपात करते, ज्यामुळे वजन घटण्यास सुरवात होते.

उपवास करताना, ब्रेन डेरिव्हाइड न्यूरोट्रॉफिक फॅक्टर (BDNF) नावाच्या हार्मोनची पातळी देखील कमालीची वाढते, त्यामुळे मेंदूच्या पेशींची वाढ होण्यास मदत होते. या फास्टिंगमुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता (फोकस) सुधारते आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका कमी होतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
उपवास करताना, शरीर ऑटोफॅजी प्रक्रिया सक्रिय करते, ज्यामुळे खराब झालेले आणि मृत पेशी साफ होण्यास मदत होते.यामुळे शरीर आतून निरोगी आणि उत्साही रहाते. जास्त वेळ न खाल्ल्याने शरीराला इन्सुलिनचा वापर अधिक प्रभावीपणे करते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहण्यास मदत मिळते आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका देखील कमी होतो. या डाईट दरम्यान भरपूर पाणी प्या. उपवास संपल्यानंतर, निरोगी आणि प्रामुख्याने संतुलित आहार घ्या.

हे देखील वाचा –

Pune Crime News : पत्नीने गळा आवळून केला पतीचा खून..

(वरील वृत्त फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवले आहे, वरील माहितीची आम्ही पुष्टी करत नाही.)

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या