ITI Admission : कौशल्य (Skill), रोजगार (Employment), उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अर्थात आयटीआयमधील प्रवेशासाठी आणखी एक संधी दिली आहे. तब्बल सहा फेरीत (six admission rounds) आतापर्यंत १ लाख २५ हजार ८२० विद्यार्थ्यांनी प्रवेश विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.आता आयटीआय प्रवेशासाठी दिलेल्या मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्यांना या महिनाअखेरपर्यंत म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करुन प्रवेश घेता येणार आहे.
आतापर्यंत राबविण्यात आलेल्य फेऱ्यांनंतरही विविध संस्थांमध्ये २४ हजार ६२८ जागा रिक्त आहेत.त्यातच अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केल्या संचालनालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.त्यानुसार प्रवेशाची आणखी एक फेरी १२ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे.ही फेरी ३० सप्टेंबरपर्यंत चालेल.
राज्यातील खासगी आणि शासकीय अशा १ हजार आयटीआयमध्ये विविध ट्रेड्ससाठी प्रवेश प्रक्रियेच्या सहा कॅप फेऱ्या आतापर्यंत पार पडल्या. या सहा फेऱ्यांमधून आतापर्यंत १ लाख २५ हजार ८२० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. यामध्ये १ लाख ४ हजार २०० मुले व २१ हजार ६१९ मुली सहभागी झाल्या. शासकीय आयटीआयमध्ये ८८ हजार ४४४, तर खासगी आयटीआयमध्ये ३३ हजार ३७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे .
हे देखील वाचा –
तब्बल दीड लाख रुपयांची कपात! टोयोटाची सर्वात लोकप्रिय गाडी झाली खूपच स्वस्त
गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार! नवीन GST नियमांमुळे Hyundai Aura झाली खूपच स्वस्त, वाचा किंमत