Home / महाराष्ट्र / जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरची अटल सेतूवरून आत्महत्या

जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरची अटल सेतूवरून आत्महत्या

मुंबई- मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) काल रात्रीच्या सुमारास एका डॉक्टरने (Doctor) उडी मारून...

By: Team Navakal
J. J. Hospital doctor commits suicide from Atal Setu

मुंबई- मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतू पुलावरून (Atal Setu Bridge) काल रात्रीच्या सुमारास एका डॉक्टरने (Doctor) उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. डॉ. ओंकार भागवत कवितके (३२) असे या डॉक्टरचे नाव आहे. ते कळंबोली येथील रहिवासी होते. ते मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात कार्यरत होते. त्यांना पुलावरून उडी मारताना एका व्यक्तीने पाहिले आणि याबाबत पोलिसांना (Police) माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी ओंकार यांची चारचाकी आणि मोबाईल (Mobile)सापडला.

पोलिसांनी माहिती दिली की, ओंकार कवितके यांनी अटल सेतूवर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर चारचाकी थांबवून खाडीत उडी मारताना एका व्यक्तीने पाहिले. त्याने पोलिसांना याची माहिती दिली. नियंत्रण कक्षाला याबद्दल समजल्यानंतर पोलीस आणि बीट मार्शल लगेच घटनास्थळी पोहोचले. यावेळी ध्रुवतारा बोट, शोध पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांना पुलावर ओंकार यांची चारचाकी आणि एक आयफोन मिळाला. मोबाईलमुळे त्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली. ओंकार यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला, याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title:
For more updates: , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या