मुंबई – नऊ थर लावण्याचा विक्रम करणारे प्रसिद्ध जय जवान पथक (Jai Jawan Dahi Handi team)यंदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रो-गोविंदा स्पर्धेत (Pro-Govinda competition)सहभागी होऊ शकणार नाही. यावरून आरोपपत्यारोप सुरू झाले आहेत.
प्रो-गोविंदा स्पर्धेच्या आयोजनकांनी राजकारण करुन डावलल्याचा आरोप जय जवान गोविंदा पथकाकडून करण्यात आला आहे. ठाकरे बंधू यांच्या मराठी भाषा विजयी मेळाव्याला (Marathi language rally)थर लावून जय जवान पथकाने सलामी दिली होती . त्या रागातून त्यांना बाहेर काढले असे म्हटले जाते. मात्र आयोजक म्हणतात की पथकाने नोंदणी करण्यास उशीर केला . त्यामुळे त्यांची नोंद न झाल्याने त्यांना संधी देता येणार नाही. शेवटच्या दिवशी शेवटच्या मिनिटापर्यंत जय जवान पथक नोंदणी साठी का थांबले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रताप सरनाईकांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी प्रो-गोविंदाचे आयोजन केले आहे. गुरुवार ७, शुक्रवार ८ आणि शनिवार ९ ऑगस्ट रोजी वरळीमधील डोम (Dome in Worli)येथे प्रो गोविंदाची स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेसाठी १० जूनला दुपारी १२ पर्यंत होती नोंदणीची मुदत (registration deadline)होती. जय जवान गोविंदा पथकाने प्रो गोविंदामध्ये भाग घेण्यासाठी १२ वाजून ४ मिनिटांनी नोंदणी केली. १२ वाजून ०४ मिनिटांनी नोंदणी करणाऱ्या दोन मंडळांना प्रो गोविंदा आयोजकांनी संधी दिली आहे. पण जय जवान गोविंदा पथकाला संधी देण्यात आली नाही असा आरोप जय जवान गोविंदा पथकाने केला.
याबाबत जय जवान गोविंदा पथकाचे व्यवस्थापक विजय निकम (Vijay Nikam)म्हणाले की, प्रो गोविंदामध्ये भाग घेण्यासाठी १२ वाजून ४ मिनिटांनी रजिस्ट्रेशन केले. खोपटचा राज आणि नूतन बालवाडी या दोन पथकांनी देखील तेव्हाच रजिस्ट्रेशन केले. त्यांना संधी देण्यात आली ,पण आम्हाला देण्यात आली नाही. कुठेतरी जय जवान गोविंदा पथकावर या आयोजकांकडून अन्याय करण्यात आला आहे.
१० जूनला दुपारी १२ पर्यंत स्पर्धेसाठी नोंदणीची मुदत होती. जय जवान पथकाच्या स्पर्धेत नोंदणीस काही मिनिटे उशीर झाला. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे नियमानुसार करण्यात आली आहे. ज्या ३२ संघांनी पहिली नोंदणी केली,त्या ३२ संघांना संधी देण्यात आली. माझ्या मतदारसंघातील गोविंदा पथकांच्या क्रमांक ३३ वा होता, त्यांनादेखील संधी नाकारण्यात आली. गेल्या वर्षीच्या उपविजेत्यांचीही यंदा संधी देण्यात आली नाही. विजयी मेळाव्याच्या (Thackeray event) दोन आठवडे पूर्वीच निवड प्रक्रिया झाली असल्याने हे सर्व आरोप (political allegations) निराधार आहेत असे स्पष्टीकारण आयोजक पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik clarified)दिले.