Jain boarding controversy – मॉडेल कॉलनीतील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीचा विक्री व्यवहार तत्काळ रद्द करून न्याय मिळावा, या मागणीसाठी आज जैन समाजाने (Jain community) एकदिवसीय उपवास केला. जमीन आणि मंदिर पुन्हा जैन समाजाच्या ताब्यात येईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार जैनमुनी गुप्तनंद महाराज यांनी व्यक्त केला.
गुप्तनंद महाराज (Guptanand Maharaj) म्हणाले की, गोखले बिल्डर आणि ट्रस्टी यांनी माघार घेण्याची तयारी दर्शवली असली तरी कायदेशीरदृष्ट्या हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उद्या धर्मादाय आयुक्तांकडे या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. जोपर्यंत जमीन विक्री व्यवहार रद्द झाल्याचा अधिकृत कागद जैन समाजाच्या हाती येत नाही तोपर्यंत साधना, आंदोलन आणि लढा सुरूच राहील.
आज संपूर्ण जगात भगवानसाठी उपवास (Fasting)केला जात आहे. इथे दिसायला जरी ५०-६० लोक असले तरी जगभरातील हजारो लोक आज उपवास करत आहेत. सर्वांचा एकच भाव आहे. या उपवासाच्या शक्तीमुळे आमचे पुण्य वाढावे आणि धर्मादाय आयुक्तांना योग्य निर्णय घेण्याची बुद्धी प्राप्त व्हावी.गुप्तनंद महाराजांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळाने जैन बोर्डिंगमध्ये येऊन प्रायश्चित्त करावे, अशी मागणीही केली.
हे देखील वाचा –
साठीतल्या माजी नगरसेवकांना मुंबईत उबाठाचे तिकीट नाही?पालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार
दोन-चार मंत्र्यांना कापा…’; रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान









