Jain Community – मुंबईतील कबुतरखाने (Pigeon)बंद केल्यामुळे नाराज झालेल्या जैन समाजाने मुनी निलेशचंद्र विजय यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात (Azad Maidan) काही दिवसांपूर्वी उपोषण (Hunger strike) केले होते. त्या वेळी राज्य सरकारने १५ दिवसांच्या आत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते.


मात्र, सरकारने दिलेला शब्द पाळला नाही.त्यामुळे जैन समाजाने पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. दादरच्या कबुतरखाना परिसरातच आंदोलन करण्यात येईल,असे मुनी निलेशचंद्र विजय (Muni Nileshchandra Vijay)यांनी सांगितले.
ते म्हणाले की, आझाद मैदानातील उपोषणावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)यांच्याकडून लवकर निर्णय करून घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्ही सरकारला १५ दिवसांचा वेळ दिला होता. आज १५ दिवसांचा कालावधी संपला आहे. कबूतरखान्यांच्या संरक्षणासाठी, जीवदयेच्या दृष्टीने जैन समाजाच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, असा आमचा आग्रह होता.
पण आजतागायत कोणताही स्पष्ट निर्णय झाला नाही. जर २८–२९ नोव्हेंबरपर्यंत निर्णय न झाल्यास मी पुन्हा आमरण उपोषणाला बसेन आणि यावेळी हे उपोषण दादर कबुतरखाना (Dadar kabutarkhana)परिसरातच होईल.
हे देखील वाचा –
नवले पूल नव्याने उभारणार; मंत्री उदय सामंतांची घोषणा
मुंबईत दिवसाढवळ्या खुणांचा थरार! कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या









