Jain muni hunger strike: महापालिकेने बंद केलेला दादरचा कबुतरखाना ताबडतोब सुरू करावा, या मागणीसाठी तसेच जैन मंदिरांवरील कारवाईच्या निषेधार्ह जैन मुनी नीलेशचंद्र विजय (Jain Muni Nileshchandra Vijay) यांनी आज आझाद मैदानात (Azad Maidan) उपोषण सुरू केलेले उपोषण मागे घेतले. मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जैन मुनी निलेशचंद्र विजय यांची भेट घेतली. चर्चेनंतर सरकारतर्फे १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शासनाच्या आश्वासनानंतर जैन मुनींनी आमरण उपोषण मागे घेतले.
उपोषण मागे घेतल्यानंतर मुनी नीलेशचंद्र विजय म्हणाले की, दादर कबूतरखाना सुरू व्हावा म्हणून आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. मात्र भाजपाचे नेते आमदार राहुल नार्वेकर आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आमची भेट घेऊन पंधरा दिवसात यातून मार्ग काढू असे आश्वासित केले आहे. त्यामुळे मी आझाद मैदानवरील उपोषण मागे घेत आहे. माझ्या तीन मागण्या आहेत. आम्हाला मुस्लिम बोर्डासारखे सनातन बोर्ड हवे आहे. गोरक्षकांवरील हल्ले थांबवा आणि आमचे ५२ कबुतरखाने पुन्हा खुले करा. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा शांतीप्रिय आंदोलन करू. मी पालिकेच्या आणि न्यायालयाच्या दोन तासांच्या निर्णयावर संतुष्ट नाही.
आझाद मैदानात उपोषण स्थळी नीलेशचंद्र यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावला आहे. या फोटोची चर्चा सर्वत्र सुरू होती.
हे देखील वाचा –
अमेरिकेकडे जगाचा दीडशे वेळा विनाश करण्याएवढी अण्वस्त्रे; ट्रम्प यांनी पुन्हा धमकावले









