Home / महाराष्ट्र / Jalgaon News: जळगावमध्ये भाजपचा बंडखोरांना ‘धक्का’; 27 पदाधिकाऱ्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

Jalgaon News: जळगावमध्ये भाजपचा बंडखोरांना ‘धक्का’; 27 पदाधिकाऱ्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी

Jalgaon News: जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश धुडकावून बंडखोरी करणाऱ्या आणि महायुतीच्या...

By: Team Navakal
Jalgaon News
Social + WhatsApp CTA

Jalgaon News: जळगाव महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाची मोठी कारवाई केली आहे. पक्षादेश धुडकावून बंडखोरी करणाऱ्या आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करणाऱ्या तब्बल 27 पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्षातून तकालफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, बंडखोरांना हा एक कडक इशारा मानला जात आहे.

बंडखोरी आणि मतदारांची दिशाभूल

जळगावमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती पक्की झाली आहे. मात्र, काही इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले होते. हे बंडखोर उमेदवार प्रचारादरम्यान भाजपच्या चिन्हाचा किंवा नावाचा वापर करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी दोन दिवसांपूर्वीच अशा उमेदवारांना आपली भूमिका स्पष्ट करण्याचा इशारा दिला होता. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.

प्रमुख नेत्यांवर कारवाईची कुऱ्हाड

या कारवाईत प्रामुख्याने जळगाव महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांचा समावेश आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे पुत्र प्रफुल्ल देवकर यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. तसेच, उमेदवारी नाकारल्यामुळे आमदार सुरेश भोळे यांना घेराव घालणाऱ्या संगीता पाटील यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि सर्व पदे या २७ जणांकडून काढून घेण्यात आली आहेत.

हकालपट्टी करण्यात आलेल्यांची नावे:

भाजपने जारी केलेल्या यादीनुसार जितेंद्र मराठे, संगिता पाटील, हर्षदा सांगोरे, गणेश बाविस्कर, रंजना सपकाळे, कांचन सोनवणे, प्रमोद शिंपी, भरत सपकाळे, हिरकणी बागरे, चेतना चौधरी, मयूर बारी, तृप्ती पाटील, सुनील पाटील, विकास पाटील, गिरीश भोळे, कैलास पाटील, हेमंत भंगाळे, प्रिया केसवानी, रूपाली चौधरी, अंजू निंबाळकर, मयुरी चौथे, जयश्री वंजारी, ज्योती पाटील, उज्ज्वला घुगे, दिनेश ढाकणे आणि कोकिळा मोरे यांची हकालपट्टी झाली आहे.

या तडकाफडकी निर्णयामुळे भाजपमध्ये शिस्त राखण्यासाठी वरिष्ठ नेतृत्व किती ठाम आहे, हे स्पष्ट झाले आहे. महायुतीच्या जागा वाचवण्यासाठी आणि अंतर्गत बंडाळी मोडून काढण्यासाठी उचललेले हे पाऊल जळगावच्या राजकारणात कोणते नवे वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा – Mumbai Local Fire: मध्य रेल्वेवर ‘बर्निंग ट्रेन’चा थरार! कुर्ल्याजवळ कचरावाहू लोकलला भीषण आग

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या