Home / महाराष्ट्र / Jalgaon Municipal Corporation : युतीचा घोळ, एबी फॉर्मचा खेळखंडोबा;छाननीत १३५ अर्ज बाद; ; शेवटपर्यंत रंगली राजकीय नाट्यकथा…

Jalgaon Municipal Corporation : युतीचा घोळ, एबी फॉर्मचा खेळखंडोबा;छाननीत १३५ अर्ज बाद; ; शेवटपर्यंत रंगली राजकीय नाट्यकथा…

Jalgaon Municipal Corporation : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी अधिकृत छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीदरम्यान...

By: Team Navakal
Jalgaon Municipal Corporation
Social + WhatsApp CTA

Jalgaon Municipal Corporation : जळगाव महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची बुधवारी अधिकृत छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीदरम्यान शहरातील १९ प्रभागांमधून दाखल झालेल्या एकूण १०३८ उमेदवारी अर्जांपैकी १३५ अर्ज विविध कारणांमुळे अवैध ठरविण्यात आले, तर ९०३ अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत.

छाननी प्रक्रियेत प्रामुख्याने तांत्रिक स्वरूपातील त्रुटी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न होणे तसेच पक्षांतर्गत समन्वयाचा अभाव ही कारणे पुढे आली. यामुळे काही प्रस्थापित व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या उमेदवारांचे अर्जही बाद झाले असून, या निर्णयाची शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

या छाननी प्रक्रियेत सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा निर्णय म्हणजे भाजपच्या माजी महापौर जयश्री धांडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरणे. त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या ‘एबी फॉर्म’वर आवश्यक स्वाक्षरी नसल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा भाजपचा अधिकृत अर्ज रद्द केला.

मात्र, याचवेळी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल केलेला असल्यामुळे त्यांची निवडणूक रिंगणातील उपस्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे त्या आता भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडीमुळे संबंधित प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग क्रमांक ३ क मधील डॉ. सुषमा चौधरी आणि प्रभाग ०९ मधील नितीन जाधव यांच्या अर्जात एबी फॉर्मवरील आवश्यक स्वाक्षरी नसल्याने बाद ठरवण्यात आले. मात्र, ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवरील डिजिटल स्वाक्षरीविरोधात भाजपने घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे.

दरम्यान, प्रभाग १० मधील भाजप उमेदवार जाकीर खान रसूल खान यांच्याविरोधात दाखल तक्रार देखील फेटाळण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा ठाम इशारा दिला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी देखील प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण होता. त्यामुळे निवडणूक कर्मचारी पहाटे २:३० वाजेपर्यंत कार्यरत होते. सकाळी ९ वाजल्यापासून सुरु झालेली हि छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दुसरीकडे, भाजपने नाशिक मनपात निवडून येण्याची क्षमता तसेच निवडणूक सर्व्हेच्या नावाखाली आपल्याच पक्षाच्या अनेक माजी नगरसेवक आणि निष्ठावानांना डावलण्यात आले. आणि निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ऐनवेळी आलेल्यांना संधी दिली आहे. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घालायचे देखील समोर आले.

यासगळ्यामुळे काहींनी पक्षांतरे केली. तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल २३ आयरामांना उमेदवारी दिली आहे.नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठी २३५७ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी भाजपने सर्वाधिक ११८, उमेदवार दिले असले तरी प्रभाग १४ मध्ये या पक्षाला एकही उमेदवार देता आलेला नसल्यचे समोर आले आहे. या सगळ्याप्रकारामुळे भाजपमध्ये तीस-चाळीस वर्षे काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागल्याचे दिसून आले.

हे देखील वाचा –  ‘ठाकरे बंधूंप्रमाणे आम्हीही एकत्र येऊ’; निवडणुकीपूर्वी आनंदराज आंबेडकरांचे मोठे विधान; राजकीय समीकरणे बदलणार?

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या