Home / महाराष्ट्र / मांसबंदीविरोधात कोंबडी मोर्चा जलील-आव्हाडांची मटण पार्टी

मांसबंदीविरोधात कोंबडी मोर्चा जलील-आव्हाडांची मटण पार्टी

कल्याण –स्वातंत्र्यदिनानिमित्त आज कल्याण-डोंबिवली(Kalyan-Dombivli), नागपूर (Nagpur), अमरावती (Amravati), मालेगाव (Malegaon) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) या महापालिकांनी (Municipality) मांसविक्रीवर बंदी...

By: Team Navakal
KDMC PROTEST

कल्याण –स्वातंत्र्यदिनानिमित्त आज कल्याण-डोंबिवली(Kalyan-Dombivli), नागपूर (Nagpur), अमरावती (Amravati), मालेगाव (Malegaon) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) या महापालिकांनी (Municipality) मांसविक्रीवर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात कल्याण-डोंबिवलीत पालिकेविरोधात कोंबड्या घेऊन आंदोलन करण्यात आले. या निर्णयाचा विरोध करत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड ((Jitendra Awhad) यांनी कल्याणमधील एका हॉटेलमध्ये मांसाहारी जेवण केले. तर एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी त्यांच्या घरी मटण पार्टीचे आयोजन केले होते.

कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वातंत्र्यदिनी मटण-मांस विक्रीबंदीचा निर्णय मागे न घेतल्याने आज सकाळी हिंदू खाटिक समाज, धर्मवीर खाटिक समाज संस्था, काँग्रेससह विविध सामाजिक संस्थांनी महापालिकेवर मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी पालिकेसमोर हातात जिवंत कोंबड्या घेऊन, कोंबडा पहाटे जाग आणतो, तसेच चुकीच्या निर्णयांवर आम्ही प्रशासनाला जाग आणू, असा इशारा दिला. यावेळी सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मांसविक्री आदेशाच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर, नागपूर व मालेगावात बंद पाळण्यात आला. नागपूरमधील काही खाटिकांनी एक दिवस दुकाने बंद ठेवल्याने फरक पडत नाही, असे मत व्यक्त केले. मात्र अमरावती व नाशिकमध्ये मांसविक्रीची दुकाने सुरू होती.

कल्याणमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी हॉटेलमध्ये मांसाहारी जेवण करून मांसबंदीला विरोध दर्शवला. पत्रकार परिषदेत त्यांनी शासन आदेशात विक्रीबंदीचा उल्लेख नसल्याचे सांगत, प्राणी म्हणजे चार पायांचे जनावर, कोंबडी हा पक्षी आहे, अशी टीका केली. त्याचप्रमाणे, इम्तियाज जलील यांनीही बंदीचा निषेध नोंदवत आपल्या घरी मटन-चिकन बिर्याणी पार्टी आयोजित केली. त्यांनी या पार्टीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजीनगरचे पालिका आयुक्तांना निमंत्रण दिले होते. त्या दोघांच्या नावाच्या पाट्या आणि खुर्च्यादेखील ठेवल्या होत्या.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या