प्रमाणपत्र दिरंगाईमुळे जरांगेंचा कार्यालये घेरण्याचा इशारा

manoj jarange patil

जालना – धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात मराठा (Maratha) समाजातील मुलांना जाणीवपूर्वक ओबीसी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र उशिरा दिले जात आहे. याबाबत मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांना चार ते पाच वेळा चर्चा केली. पण मार्ग निघाला नाही. अधिकाऱ्यांना समज द्या नाहीतर आम्ही राज्यातील कार्यालयांना घेराव घालू असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठी कुणबी (Kunbi) पडताळणीत अडवणूक केली जात आहे. आमच्यासमोर प्रमाणपत्र द्यायला सांगतात. मात्र आमच्या मागे अधिकाऱ्यांना दिरंगाई करण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. ही माहिती अधिकाऱ्यांनीच दिली आहे. याचे परिणाम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( CM Devendra Fadanvis) यांच्या सरकारला भोगावे लागतील. धाराशिव जिल्ह्यातील हजारो मराठा बांधवाच्या कुणबी नोंदी रोखल्या आहेत. मी फडणवीसांना सांगू इच्छितो की, तुम्ही ही अडवणूक थांबवा. अन्यथा याचे परिमाण तुम्हाला भोगावे लागतील. प्रमाणपत्र देऊनदेखील पडताळणी प्रमाणपत्र दिले जात नाही. हा प्रकार ज्यांच्या मंत्रालयाच्या अख्यारीत येतो, ते मंत्री संजय शिरसाट यांचेनादेखील तीन ते चार वेळा याबाबत लक्ष वेधले. शिरसाट हे आमच्या समाधानासाठी अधिकाऱ्यांना फोन करतात आणि पडताळणीच्या सूचना करतात. तर दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांना पडताळणी थांबवण्याचे आदेश देतात. मराठ्यांच्या पोरांचे प्रवेश रोखले गेले पाहिजे. नोकरीची संधी हुकली पाहिजे, त्यानंतर प्रमाणपत्र दिले पाहिजे. शिरसाट एकीकडून मराठ्यांची मनधरणी करत आहेत तर दुसरीकडून मराठ्यांच्या मुलाची अडवणूक करून नुकसान करत आहेत. तुमचे अधिकारी संभाळा नाहीतर घेराव घालू. आता ज्या जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र किंवा पडताळणी रोखली जाईल, त्या जिल्ह्यात जाऊन आम्ही घेराव घालणार.