Jio Recharge Offer : सणासुदीच्या काळात टेलिकॉम कंपन्या सध्या ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देत आहेत. अनेक प्लॅनमध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन आणि सूटचा लाभ देखील मिळतो. जर तुम्ही या काळात उत्तम रिचार्ज प्लॅन शोधत असाल, तर जिओचा हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. या प्लॅनमध्ये भरपूर इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दीर्घ वैधतेचा लाभ मिळणार आहे.
जिओचा हा रिचार्ज प्लॅन ग्राहकांमध्ये खूप प्रचंड लोकप्रिय आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, पुरेसा इंटरनेट डेटा आणि इतर आकर्षक फायदे देखील मिळतात. तसेच, ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन देखील यात समाविष्ट आहे. देशभरातील अनेक वापरकर्ते त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी हा प्लॅन निवडणे अधिक सोयीस्कर असल्याचा दावा करतात. जिओचा ₹८५९ किंमतीचा हा रिचार्ज प्लॅन वापरकर्त्यांना एकूण ८४ दिवसांची वैधता प्रदान करणारा आहे. या कालावधीत ग्राहकांना कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक आकर्षक फायदे देखील मिळतात, ज्यामुळे हा प्लॅन अधिक लोकप्रिय देखील ठरला आहे.
जर तुमच्याकडे ५जी स्मार्टफोन असेल आणि तुम्ही जिओच्या ५जी नेटवर्कसाठी पात्र असाल, तर या रिचार्ज प्लॅनसह तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क न देता अमर्यादित ५जी इंटरनेटचा वेगवान आणि अखंड अनुभवाचा लाभ मिळणार आहे. आणि जर तुम्ही 4G स्मार्टफोन वापरकर्ता असाल, तर या जिओ प्लॅनअंतर्गत तुम्हाला दररोज 2GB डेटा देखील मिळेल. ठराविक मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 kbps इतका राहील. याशिवाय, वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील दिली जाते.
या जिओ रिचार्ज प्लॅनचा मुख्य फायदा असा कि हा प्लॅन तुम्हाला दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. मनोरंजन प्रेमींसाठी यात तीन महिन्यांचे जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे, ज्यावर तुम्ही चित्रपट आणि वेब सिरीज देखील पाहू शकता. तसेच, जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा अॅक्सेसही या प्लॅनसोबत तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
हे देखील वाचा – 300 कोटींची कमाई करणारा चित्रपट लवकरच OTT वर; या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज